राज्यातील केळी उत्पादकांना ‘अच्छे दिन’
By Admin | Updated: April 6, 2015 02:03 IST2015-04-06T02:03:12+5:302015-04-06T02:03:12+5:30
केळीच्या उत्पादनात वाढ; दहा वर्षात दरात दुपटीने वाढ.

राज्यातील केळी उत्पादकांना ‘अच्छे दिन’
ब्रम्हानंद जाधव / मेहकर: राज्यात केळी लागवडीच्या क्षेत्रात वाढ होऊन उत्पादनही सुमारे ५ हजार २00 टनाच्यावर पोहचले आहे. गत दहा वर्षात केळीच्या प्रतिक्विंटल दरामध्ये दुपटीने वाढ झाली असून, राज्यातील केळी उत्पादकांना ह्यअच्छे दिनह्ण आले आहेत. राज्यातील पीक पेरणीच्या क्षेत्रापैकी सरासरी ४४ हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे. त्यापैकी केळी लागवडीचे ५0 टक्के क्षेत्र हे जळगाव जिल्ह्यातील आहे. त्यामुळे जळगांव जिल्ह्याला केळीचे आगार मानले जाते. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील वसमत तालुका केळी उत्पादनात अग्रेसर आहे. तसेच बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुका व चिखली तालुक्यातील मेरा चौकीची केळीही प्रसिद्ध आहेत. मात्र उर्वरीत विदर्भातील शेतकर्यांनी सुद्धा आधुनिक शेतीची कास धरत केळी लागवड करण्यास सुरूवात केली आहे. जळगाव जिल्ह्यापाठोपाठ विदर्भातील शेतीची केळीची शेती आता नावारुपाला आली आहे. राज्यात केळी लागवड क्षेत्रामध्ये गेल्या दहा वर्षांंत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. राज्यात सन २00४-0५ मध्ये ६२ हजार ७00 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली होती. त्यामध्ये ४ हजार २00 टन उत्पादन घेण्यात आले होते. त्यानंतर सन २00९-१0 मध्ये ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झाली होती. त्यामध्ये ४ हजार ३00 टन उत्पादन घेण्यात आले होते. सन २0१0-११ मध्ये ७९ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली, त्यामध्ये ४ हजार ५00 टन उत्पादन झाले. सन २0१२-१३ मध्ये ८0 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली, त्यामध्ये ४ हजार ६00 टन उत्पादन झाले. तर सन २0१३-१४ मध्ये ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली, त्यामध्ये ५ हजार २00 टन उत्पादन झाले. गत दहावर्षात केळीच्या लागवड क्षेत्रामध्ये जवळपास दीडपटीने वाढ झाली असून, उत्पादनामध्येही हजारो टन वाढ झाली आहे. सन २00४-0५ मध्ये केळीचे प्रतिक्वंटल दर केवळ ६२५ रुपये होते. परंतु गत काही वर्षापासून दुष्काळ, करपा रोग, अवकाळी पाऊस, वादळ, गारपिटीने राज्यात सर्वत्र केळी पिकाचे आतोनात नुकसान होत आहे. तसेच निविष्ठांवरील खर्चही बेसुमार वाढल्याने केळीचा उत्पादनखर्च आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे केळीच्या प्रतिक्विंटल दरातही वाढ केली जात असून, सन २0१३-१४ मध्ये केळीचे प्रतिक्विंटल दर १ हजार १५0 रुपयेच्यावर पोहचले आहेत. गत दहावर्षात केळीच्या प्रतिक्विंटल दरामध्ये दुपटीने वाढ झाल्याने केळी उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.