बाळापूर तालुका @ ८६.३६ %

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 01:19 IST2017-05-31T01:19:22+5:302017-05-31T01:19:22+5:30

बाळापूर: बाळापूर तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल ८६.३६ टक्के एवढा लागला आहे. बाळापूर तालुक्यातील २४९६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यातील २५३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

Balapur Taluka @ 86.36% | बाळापूर तालुका @ ८६.३६ %

बाळापूर तालुका @ ८६.३६ %

लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर: बाळापूर तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल ८६.३६ टक्के एवढा लागला आहे. बाळापूर तालुक्यातील २४९६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यातील २५३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांपैकी ४२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, १३४५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १ हजार विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १४३ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले. तालुक्यातील हातरूण येथील हाजी शेख उमराव सायन्स कॉलेजचा १०० टक्के निकाल लागला आहे. वाडेगाव येथील जागेश्वर ज्युनिअर कॉलेज व्होकेशनलचा २९.४१ टक्के असा सर्वात कमी निकाल लागला आहे.
धनाबाई ज्युनिअर कॉलेज बाळापूरचा ८६.४३ टक्के, जागेश्वर ज्युनिअर कॉलेज वाडेगावचा ९३.१० टक्के, शिवाजी ज्युनिअर कॉलेज निंबाचा ८४.११ टक्के, सरस्वती ज्युनिअर कॉलेज पारसचा ७५.१७ टक्के, डॉ. मनोरमा प्रा. हरिभाऊ पुंडकर विद्यालय बाळापूरचा ८६.४३ टक्के, महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज हातरुणचा ९६.९२ टक्के, अंजुमन अन्वारूल इस्लाम ज्युनिअर कॉलेज बाळापूरचा ६२.२६ टक्के, यशोदाबाई इंगळे ज्युनिअर कॉलेज व्याळाचा ९१.३७ टक्के, जिजामाता ज्युनिअर कॉलेज नया अंदुराचा ९४.५० टक्के, डॉ. नानासाहेब चिंचोळकर ज्युनिअर कॉलेज वाडेगावचा ६६.६६ टक्के, शिवशंकर ज्युनिअर कॉलेज उरळ बु.चा ९४.७७ टक्के, जोड आहे....
गुलाम नबी उर्दू ज्युनिअर कॉलेज वाडेगावचा ५६.०० टक्के, समर्थ स्कूल ज्युनिअर कॉलेज गायगावचा ८५.४५ टक्के, संजय गांधी उर्दू ज्युनिअर कॉलेज हातरुणचा ७७.२७ टक्के, महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज पारसचा ८४.९६ टक्के, बहिणाबाई खोटरे कन्या ज्युनिअर कॉलेज बाळापूरचा ७१.४२ टक्के, गुलाम जैनुल आबेदीन गुलाम ज्युनिअर कॉलेज पारसचा ६१.२९ टक्के, बळीरामजी वराळे ज्युनिअर कॉलेज अंदुराचा ७७.१४ टक्के, नॅशनल मिलिटरी ज्युनिअर कॉलेज गायगावचा ७२.९७ टक्के , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्युनिअर कॉलेज भरतपूरचा ८९.४७ टक्के, भाऊसाहेब तिरूख ज्युनिअर कॉलेज खिरपुरीचा ८९.५८ टक्के, हब्याबाई उर्दू ज्युनिअर कॉलेज लोहाराचा ८५.९३ टक्के, हुस्सामिया उर्दू ज्युनिअर कॉलेज बाळापूरचा ७७.९६ टक्के, व्ही.बी. देशमुख ज्युनिअर कॉलेज रिधोराचा ९० टक्के , आर्ट, कॉमर्स ज्युनिअर कॉलेज बाळापूरचा ९२.३० टक्के, हाजी शे. उमराव ज्युनिअर कॉलेज हातरुणचा १०० टक्के, एल.एन. सिन्हा ज्युनिअर कॉलेज वाडेगावचा ५२ टक्के, जागेश्वर ज्युनिअर कॉलेज व्होकेशनल वाडेगावचा २९.४१ टक्के, शिवाजी ज्युनिअर कॉलेज निंबाचा ७७.५८ टक्के, सरस्वती ज्युनिअर कॉलेज पारसचा ७८.५७ टक्के आणि जिजामाता ज्युनिअर कॉलेज नया अंदुराचा ९५.४१ टक्के निकाल लागला आहे.

Web Title: Balapur Taluka @ 86.36%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.