शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शरीराचे संतुलित तापमान करेल उष्माघातापासून बचाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 12:52 IST

अकोला: उन्हाचा पारा सध्या आपलेच रेकॉर्ड मोडतो आहे. परिणामी, उष्माघात आणि त्यामुळे मृत्यू होण्याची भीतीही वाढली आहे. यापासून स्वत:चा बचाव करायचा असेल, तर शरीराचे तापमान संतुलित राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

अकोला: उन्हाचा पारा सध्या आपलेच रेकॉर्ड मोडतो आहे. परिणामी, उष्माघात आणि त्यामुळे मृत्यू होण्याची भीतीही वाढली आहे. यापासून स्वत:चा बचाव करायचा असेल, तर शरीराचे तापमान संतुलित राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.अकोल्यात जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद मागील काही दिवसांपासून केली जात आहे. हीच स्थिती आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. वाढत्या तापमानामुळे शरीराचे तापमानदेखील प्रभावित होते. त्यामुळेच चक्कर येणे, उलट्या होणे, उन्हाळी सर्दी, डोकेदुखी, ताप येणे आणि जास्तच प्रभावित झाल्यास उष्माघाताची शक्यताही नाकारता येत नाही. शरीराचे तापमान गरजेपेक्षा जास्त वाढल्यास या प्रकारचे धोके संभावतात. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांत उष्माघातापासून बचाव करायचा असेल, तर भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.शरीराचे तापमान हवे ३७ अंश सेल्सिअससाधारणत: मानवी शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सिअस असते. या तापमानातच शरीरातील सर्व अवयव नीट काम करू शकतात. वातावरणातील तापमान वाढल्यास शरीर घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर काढून शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सिअस राखते; परंतु सतत घाम निघाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सतत पाणी पित राहणे गरजेचे असते; परंतु अनेकदा असे होत नाही. पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामे करते, त्यामुळे शरीरातील पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणे टाळते. जेव्हा बाहेरचे तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते, त्यावेळी शरीरातील कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प पडते. तेव्हा शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ लागते.उष्माघातामुळे मृत्यू का होतो?रक्तातील पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होते, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होते, महत्त्वाच्या अवयवांना विशेषत: मेंदूला रक्त पुरवठा थांबतो. त्यामुळे माणूस कोमात जाऊ शकतो. असे करता करता त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढवतो.उन्हाळ्याच्या दिवसांत शक्यतो सुती व पांढऱ्या रंगाचे वस्त्र वापरावे. कोल्ड्रिंकऐवजी लिंबू सरबत, नारळ पाण्याचे सेवन करावे, अशक्तपणा व ताप वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाSun strokeउष्माघातHeat Strokeउष्माघातHealthआरोग्य