बालाजी भक्तांची मांदियाळी

By Admin | Updated: October 5, 2014 01:11 IST2014-10-05T00:55:12+5:302014-10-05T01:11:11+5:30

देऊळगावराजा येथे २२ तास रंगला पालखी सोहळा : लाखो भाविकांनी घेतले दर्शन.

Balaji devotees | बालाजी भक्तांची मांदियाळी

बालाजी भक्तांची मांदियाळी

देऊळगावराजा : प्रति तिरुपती म्हणुन प्रख्यात असलेल्या तसेच ३५0 वर्षाची ऐतिहासीक परंपरा लाभलेल्या येथील श्री बालाजी महाराजांची पालखी मिरवणुक सोहळा तब्बल २२ तास रंगला. टाळकरी व भजनी मंडळीसह शुक्रवारी रात्री बारा वाजता श्री बालाजी महाराज की जय लक्ष्मी रमण गोविंदा च्या गजरात मंदीरातुन ्रपालखी परिक्रमेसाठी निघाली. शहरातील प्रमुख मार्गावरील ५४ थांब्यावर थांबत श्रींच्या भक्तांनी प्रत्यक्ष श्रींच्या मुर्तीला स्पर्श करुन मनोभावे दर्शन घेतले यावेळी सं पुर्ण शहर श्रींच्या जय घोषाने दणाणुन गेले होते.
दसर्‍याच्या रात्री परंपरागत श्रींची मुर्तीची पुजा व आरती संस्थानाचे वंशपारंपारीक विश्‍वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी केली. नंतर सजवलेल्या पालखीत श्री बालाजी महाराजांची मुर्ती विराजमान करण्यात आली. एक दिवसासाठी भक्तांना श्रींच्या मुर्तीला प्रत्यक्ष स्पर्श करुन दर्शनाचा लाभ मिळत असल्याने शेकडो भाविकांनी दर्शन घेतेले. दरम्यान आमना नदीवरील बैठकीवर श्रींची पालखी सिंमोल्लंघनाकरीता थांबते. त्यावेळी तिरुपतीचे बालाजी प्रतितिरु पती बालाजींच्या भेटीला येतात अशी आख्यायिका आहे. यावेळेत तिरुपतीच्या मंदीराचे दार बंद करण्यात येते. पालखी मिरवणुकी दरम्यान विविध समाजिक संघटनांनी ठिकठिकाणी चहा, पाणी व फराळाचे आयोजन भाविक भक् तांच्या सेवेसाठी केले होते.

Web Title: Balaji devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.