बाजोरिया यांच्या प्रचारास शेगावातून प्रारंभ
By Admin | Updated: December 11, 2015 02:46 IST2015-12-11T02:46:27+5:302015-12-11T02:46:27+5:30
विधान परिषद निवडणूक ; श्रींचे दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला.

बाजोरिया यांच्या प्रचारास शेगावातून प्रारंभ
शेगाव (जि. बुलडाणा): बुलडाणा-अकोला-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपा-सेना युतीचे उमेदवार व विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी दहा डिसेंबरला शेगाव येथे श्रींचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी श्री संत गजानन महाराज मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. त्यांच्या सह शिवसेना शहर प्रमुख संतोष घाटोळ, माजी नगराध्यक्ष शरदशेठ अग्रवाल, नगरसेवक राजूभाऊ चुलेट, दिनेश लहाने, कमलाकर चव्हाण यांच्या समवेत भाजपा-सेनेचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. श्रींचे दर्शन घेतल्यानंतर सोबत आलेल्या नगरसेवकांसोबत त्यांनी चर्चा केली. यामध्ये माजी नगराध्यक्ष शरदसेठ अग्रवाल, राजूभाऊ चुलेट, दिनेश लहाने, कमलाकर चव्हाण यांचा समावेश होता.