महावितरणाच्या आरोपी अभियंत्याला जामीन

By Admin | Updated: June 21, 2014 01:27 IST2014-06-21T00:55:18+5:302014-06-21T01:27:43+5:30

वीज जोडणी देण्यासाठी ७00 रुपयांची लाच मागण्याचा आरोप असलेल्या कनिष्ठ अभियंतास जामीन

Bailiff of Mahavitaran | महावितरणाच्या आरोपी अभियंत्याला जामीन

महावितरणाच्या आरोपी अभियंत्याला जामीन

अकोला - वीज जोडणी देण्यासाठी ७00 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेल्या महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता नवलकिशोर टावरीचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने मंजूर केला. आरोपीला गुरुवारी अटक करण्यात आली होती.
जुने शहरातील रहिवासी एका वीज ग्राहकाने नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी वीज तक्रार निवारण केंद्रात अर्ज सादर केला होता. वीज कनेक्शन देण्यासाठी या केंद्रातील कनिष्ठ अभियंता नवलकिशोर टावरीने खासगी लाईनमन श्रीकृष्ण जानकीराव पांडव यांच्यामार्फत वीज ग्राहकाला ७00 रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर आरोपी टावरीला अटक केली.
दरम्यान आरोपीला शुक्रवारी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला. आरोपीकडून अँड. मोतीसिंह मोहता यांनी युक्तिवाद केला. 

Web Title: Bailiff of Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.