लाचखोर सुनंदा मोरेचा जामीन फेटाळला
By Admin | Updated: October 17, 2014 01:19 IST2014-10-17T01:19:36+5:302014-10-17T01:19:36+5:30
एक हजार रुपयांची लाच स्वीकारणा-या लाचखोर सहायक उपनिबंधकाची दिवाळी कोठडीतच.

लाचखोर सुनंदा मोरेचा जामीन फेटाळला
अकोला: एक हजार रुपयांची लाच स्वीकारणारी लाचखोर सहायक उपनिबंधक सुनंदा मोरे हिने व तिच्या दोन सहकार्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने सुनंदा मोरे हिचा जामीन फेटाळून लावला. तिच्या दोन सहकार्यांची जामिनावर सुटका केली.
बँकेत गहाण असलेल्या प्लॉटवर बोजा चढवायला आवश्यक असलेल्या खतावणी प्रमाण पत्रासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या सहायक उपनिबंधक सुनंदा चिंतामण मोरे व तिचे सहकारी आशीष पिंजरकर, हिंमत शिराळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी सुनंदा मोरे हिच्या दुर्गा चौकातील निवासस्थानाची झडती घेतली होती. झडतीदरम्यान मोरेकडे ३३ लाख रुपयांची संपत्ती व पुण्यामध्ये बंगला असल्याची माहिती प्राप्त झाली होती. सुनंदा मोरे हिच्या दोन सहकार्यांनीसुद्धा जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यापैकी आशीष पिंजरकर व हिंमत शिराळे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला; परंतु सुनंदा मोरे हिचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने तिला दिवाळी होईपर्यंत कारागृहामध्ये दिवस काढावे लागणार आहेत. सरकारतर्फे अँड. प्रवीण चिंचोले यांनी काम पाहिले.