बी.एड.च्या परीक्षेत सावळा गोंधळ !
By Admin | Updated: April 21, 2015 00:27 IST2015-04-21T00:27:32+5:302015-04-21T00:27:32+5:30
अमरावती विद्यापीठाचा प्रताप; नियोजीत प्रश्नपत्रिकेऐवजी पाठविल्या मानसशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका.

बी.एड.च्या परीक्षेत सावळा गोंधळ !
अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत घेतल्या जाणार्या बी.एड. अभ्यासक्रमाची परीक्षा सोमवार, २0 एप्रिलपासून सुरू झाली. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सोमवारी उद्योन्मुख समाजातील शिक्षक व शिक्षण या विषयाची तयारी करून आलेल्या विद्यार्थ्यांंच्या हातात २३ एप्रिल रोजी होणार्या मानसशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका पडल्याने एकच गोंधळ उडाला. वाशिम आणि बुलडाणा येथील परीक्षा केंद्रांवरही हा गोधळ उडाल्याने विद्यापीठाचा सावळा गोंधळ समोर आला. दरम्यान, सोमवारी रद्द झालेला पेपर ९ मे रोजी घेतला जाईल, असे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे बी.एड.ची परीक्षा सोमवार, २0 एप्रिलपासून सुरू झाली. सकाळी ९.३0 वाजता लरातो वाणिज्य महाविद्यालय व सुधाकरराव नाईक महाविद्यालय या दोन केंद्रांवर पहिला पेपर देण्यासाठी जमलेल्या २५0 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांंना उद्योन्मुख समाजातील शिक्षक व शिक्षण या विषयाची प्रश्नपत्रिका मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्या हाती २३ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या मानसशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका पडली आणि दोन्ही केंद्रांवर एकच गोंधळ उडाला. विद्यापीठाच्या हलगर्जीपणामुळे भलत्याच विषयाची प्रश्नपत्रिका हाती पडल्याचे समजताच विद्यार्थीच नव्हे; तर केंद्र संचालकदेखील अचंबित झाले. भलत्याच विषयाच्या प्रश्नपत्रिका वितरित झाल्याची बाब लक्षात येताच विद्यार्थ्यांंच्या सहय़ा घेऊन प्रश्नपत्रिका परत घेण्यात आल्याचे केंद्राधिकारी जे.आर. माहेश्वरी यांनी सांगितले. शहरातील दोन परीक्षा केंद्रावर बी.एड.च्या विद्यार्थ्यांंना विद्यापीठाकडून चुकीची प्रश्नपत्रिका दिल्यामुळे दोन तास गोंधळ उडाल्याने विद्यार्थ्यांंनी निवेदन सादर करून विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविषयी आपला रोष व्यक्त केला. वाशिम जिल्ह्यातील १५ तर बुलडाणा जिल्ह्यातील १३ परीक्षा केंद्रांवर हा गोंधळ उडाल्याने परीक्षाथीर्ंना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. यासंदर्भात अकोला येथील लरातो महाविद्यालयाचे केंद्राधिकारी जे. आर. माहेश्वरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विद्यापीठाने पाठविलेल्या प्रश्नपत्रिकांच्या पाकिटांवरील कोड क्रमांक १५८१ होता व आज पहिल्या दिवशी असलेल्या पेपरचा कोड क्रमांकदेखील १५८१ हाच होता. अर्थात विद्यापीठानेच प्रश्नपत्रिका पाठविल्या असल्याने त्यावर आक्षेप घेणे शक्यच नव्हते. प्रश्नपत्रिका वितरित केल्यानंतर विद्यार्थ्यांंनी २३ तारखेला असलेल्या १५८२ कोड क्रमांकाच्या प्रश्नपत्रिका वितरित झाल्या असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. दरम्यान विद्यापीठातील मायग्रेशन कमिटीच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका लिफाफ्यांमध्ये सीलबंद करण्यात येतात. सीलबंद लिफाफ्यांवर विषयाचा सांकेतांक नमूद असतो. सीलबंद असल्याने ते लिफाफे थेट विद्यार्थ्यांंसमोर उघडले जातात. त्यामुळे त्यातील घोळ लक्षात येत नाही. मायग्रेशन कमिटीने चुकीच्या प्रश्नपत्रिका लिफाफाबंद केल्याने सोमवारी बी.एड.च्या विद्यार्थ्यांंना मनस्ताप सहन करावा लागला. ह्यउदयोन्मुख समाजातील शिक्षक आणि शिक्षणह्ण या विषयाचा पेपर ९ मे रोजी घेण्यात येणार असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. जे. डी. वडते यांनी सांगीतले.