चिखलगावात रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:34 IST2020-12-16T04:34:29+5:302020-12-16T04:34:29+5:30

मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करा तुलंगा बु. : येथील तक्रारदार अजाबराव धाडसे हे ९ डिसेंबर रोजी सकाळी चान्नी ...

Bad condition of roads in Chikhalgaon | चिखलगावात रस्त्यांची दुरवस्था

चिखलगावात रस्त्यांची दुरवस्था

मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करा

तुलंगा बु. : येथील तक्रारदार अजाबराव धाडसे हे ९ डिसेंबर रोजी सकाळी चान्नी पोलीस ठाण्यात गेले होते. तक्रार दिल्यानंतर धाडसे व नीलेश खंडागळे यांनी पोलीस कर्मचारी देवा चव्हाण यांना घरी जाण्यासाठी विचारले असता, त्यांनी खंडागळे यांना मारहाण केली. या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध पोलीस अधीक्षकांनी कारवाई करावी व न्याय द्यावा, अशी मागणी धाडसे यांनी सोमवारी निवेदनाद्वारे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे.

शिक्षकाने केला नेत्रदानाचा संकल्प

मळसूर : वडिलांची नेत्रदानाची इच्छा पूर्ण करण्यासाठी दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष संजय देवराव इंगळे यांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. त्यांच्या वडिलांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता. परंतु अचानक त्यांचे निधन झाले. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी शिक्षक संजय इंगळे यांनी संकल्प केला.

Web Title: Bad condition of roads in Chikhalgaon