मूर्तिजापूर-हिवरा कोरडे रस्त्याची दुरवस्था !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:24 IST2021-02-27T04:24:36+5:302021-02-27T04:24:36+5:30

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर-हिवरा कोरडे रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता ...

Bad condition of Murtijapur-Hiwara dry road! | मूर्तिजापूर-हिवरा कोरडे रस्त्याची दुरवस्था !

मूर्तिजापूर-हिवरा कोरडे रस्त्याची दुरवस्था !

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर-हिवरा कोरडे रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे. या मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगरसेवक इब्राहिम घाणीवाला यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

गत अनेक वर्षांपासून मूर्तिजापूर-हिरपूर-हिवरा कोरडे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. तालुक्याला जोडणारा रस्ता असल्याने या मार्गाने वर्दळ सुरूच असते. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याबाबत नागरिकांनी पालकमंत्री व संबंधित अधिकाऱ्यास निवेदन देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती; मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्याची स्थिती ‘जैसे थे’ आहे. परिसरातील बोर्टा, रोहना, हिवरा, ब्रह्मी आदी गावातील नागरिकांसाठी हा रस्ता मुख्य असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याची चाळणी चाळणी झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी माजी नगरसेवक इब्राहिम घाणीवाला यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. (फोटो)

Web Title: Bad condition of Murtijapur-Hiwara dry road!