शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
3
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
4
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
5
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
6
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
7
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
8
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
9
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
10
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
11
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
12
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
13
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
14
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
15
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
16
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
17
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
18
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
19
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
20
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!

वऱ्हाड प्रांतिक शेडुल्ड कास्ट फेडरेशनच्या पहिल्या परिषदेला होती बाबासाहेबांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 14:11 IST

अकोला येथे बाबासाहेबांचे प्रथमच आगमन होणार असल्याने वºहाड प्रांतातील जनता बाबासाहेबांच्या दर्शनासाठी व त्यांचा संदेश ऐकण्यासाठी आली होते.

ठळक मुद्देअकोला स्टेशनपासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली होती. ५.३० वाजता बाबासाहेबांचे अधिवेशन मंडपात आगमन झाले. वºहाड प्रांतातील जनतेतर्फे बाबासाहेबांना देण्यात आलेले मानपत्र वाचून दाखविले.

अकोला: वऱ्हाड प्रांतिक शेडुल्ड कास्ट फेडरेशनच्या विद्यमाने पहिली परिषद अकोला येथे ९ व १० डिसेंबर १९४५ रोजी भरली होती. परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित होते. परिषदेला अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, अकोला व मध्य प्रांतातून शेकडो प्रतिनिधी उपस्थित होते. जवळपास ७० ते ७५ हजार लोक परिषदेला उपस्थित होते. अकोला येथे बाबासाहेबांचे प्रथमच आगमन होणार असल्याने वºहाड प्रांतातील जनता बाबासाहेबांच्या दर्शनासाठी व त्यांचा संदेश ऐकण्यासाठी आली होते. बाबासाहेबांच्या आगमनाची जाहिरात विस्तृत प्रमाणावर खूप आधीपासून करण्यात आली होती.अकोला स्टेशनपासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली होती. या मिरवणुकीची लांबी ३ ते ४ फर्लांग होती. अकोला स्टेशन रोड ते टिळक मैदान (आताचे शास्त्री स्टेडियम)पर्यंतचा रस्ता माणसांनी फुलून गेला होता. मिरवणुकीत अखिल भारतीय शेडुल्ड कास्ट फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी पी.एन. भोजराज, भारतीय संस्थानिक शे. का. फे. अध्यक्ष सुबय्या, म्युनिसिपल कामगार परिषदेचे नियोजित अध्यक्ष सज्जनसिंग आणि शांताबाई दाणी, नाशिक प्रामुख्याने दिसत होते. वºहाड प्रांतातील, जिल्ह्यातील समता सैनिक दलाने उत्तम शिस्त सांभाळली होती. दुतर्फी समता सैनिक दल, मधोमध पुढाऱ्यांच्या मोटारी, महिला वर्ग व इतर जनसमूह आणि सर्वांच्या पुढे नानाविध वाद्यांचे ताफे, मर्दानी दांडपट्ट्यांचे खेळ व बँड अशा उत्साही थाटात व बाबासाहेबांच्या जयघोषात मिरवणूक चालली होती. अशा अपूर्व सोहळ्यात मिरवणूक साध्वी रमाबाई नगरात विसर्जन झाली. सुबय्या यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षांनी उभारलेला निळा ध्वज उंचावर जाऊन फडकल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला व फेडरेशनचा जयघोष करण्यात आला. सुबय्या यांच्या अध्यक्षतेखाली समता सैनिक दलाच्या परिषदेचे कार्य पार पाडण्यात आले. त्यानंतर लगेच महिला परिषद शांताबाई दाणी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ५.३० वाजता बाबासाहेबांचे अधिवेशन मंडपात आगमन झाले. परिषदेची सुरुवात ६.४५ वाजता नागपूरच्या शेंदरे वकिलांच्या गायनाने झाली.स्वागताध्यक्ष डी.झेड. पळसपगार यांनी जमलेल्या मंडळी आणि बाबासाहेबांचे स्वागत केले. अकर्ते वकील, अम्रुतकर वकील, म्यु. कमिटीचे अध्यक्ष रावबहादूर आठल्ये, मुस्लीम लीगचे सभासद काझी वकील यांची भाषणे झाली. इंगळे यांनी अखिल वºहाड प्रांतातील जनतेतर्फे बाबासाहेबांना देण्यात आलेले मानपत्र वाचून दाखविले. बाबासाहेबांना १,१०१ रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. नंतर बाबासाहेबांनी भाषण दिले, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी दिली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरAkolaअकोला