पारस ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा, पथदिवे, स्वच्छताविषयक जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST2021-03-27T04:19:00+5:302021-03-27T04:19:00+5:30
पारस : येथील ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा, पथदिवे, स्वच्छताविषयी जनजागृती मोहीम सुरू सुरू केली असून, ग्रामपंचायत भवन, चौकातील पुतळे, स्मशानभूमी, ...

पारस ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा, पथदिवे, स्वच्छताविषयक जनजागृती
पारस : येथील ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा, पथदिवे, स्वच्छताविषयी जनजागृती मोहीम सुरू सुरू केली असून, ग्रामपंचायत भवन, चौकातील पुतळे, स्मशानभूमी, रस्ते व नाले सफाईला प्राधान्य दिले आहे. ग्रामपंचायतीवर नव्याने विराजमान झालेल्या सत्ताधारी गटाचे सरपंच संतोष साठे, उपसरपंच अर्शिया अंजुम मो. जफर यांनी यात विशेष लक्ष देत ग्रामपंचायत भवनला रंगरंगोटी केली. ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असून, सर्वप्रथम ग्रामपंचायतीमध्ये कचराकुंड्या, शोभिवंत वृक्ष कुंड्या, महिला पदाधिकाऱ्यांसाठी स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची व्यवस्था ही महत्त्वाची कामे केली. या कामासाठी ग्रामपंचायतीचे सदस्य शिवशंकर कडू यांनी स्वच्छतेचा ध्यासच घेतला असून, ग्रामपंचायतीसमोरील मुख्य रस्त्याची साफसफाई, पुतळ्यांची साफसफाई, गावातील आठवडा बाजाराकडील स्मशानभूमीत असलेल्या टीनशेड, दफनविधी ओटे, स्मशानभूमीत वृक्ष लागवड, स्मशानभूमीची रंगरंगोटी, सौंदर्यीकरण आदी सुविधा कडू यांनी उपलब्ध केल्या आहेत. तसेच ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा, पथदिव्यांची कामे हाती घेतली असून, ग्रामपंचायतीने सर्वच प्रभागांमधील कामांना प्राधान्य दिले आहे.