सोयाबीन बियाणे वापराबद्दल जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:19 IST2021-05-12T04:19:03+5:302021-05-12T04:19:03+5:30

फोटो: सायवणी येथे १२५ जणांची कोरोना तपासणी खेट्री : पातूर तालुक्यातील सायवणी येथे ११ मे रोजी १२५ जणांची कोरोना ...

Awareness about soybean seed use | सोयाबीन बियाणे वापराबद्दल जनजागृती

सोयाबीन बियाणे वापराबद्दल जनजागृती

फोटो:

सायवणी येथे १२५ जणांची कोरोना तपासणी

खेट्री : पातूर तालुक्यातील सायवणी येथे ११ मे रोजी १२५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. तपासणी करणाऱ्या पथकाचे ग्रामपंचायतकडून स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच शांताराम ताले, उपसरपंच ज्योती बुंदे, सदस्य मनीषा ताले, उज्ज्वला ताले, दत्तात्रय ताले, भीमराव कौस्कार, कीर्ती नीलखन, पोलीस पाटील गजानन ताले, श्रीराम ताले, संतोष बुंदे, भाऊराव राऊत, रामा कौस्कार उपस्थित होते.

पिंजर येथे शुकशुकाट

निहिदा : सात दिवसांच्या लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. सर्व किरकोळ व्यापार बंद आहेत. लॉकडाऊनला १०० टक्के प्रतिसाद मिळत आहे. यासाठी तहसीलदार गजानन हामंद, पीएसआय करुणा माहुरे, ठाणेदार महादेवराव पडघान, बिट इन्चार्ज राजू वानखडे, जमादार बेलोरकर, मुकेश जाधव परिश्रम घेत आहेत.

महेश घनगाव स्टार आयकॉन पुरस्काराने सन्मानित

निहिदा : पिंजर येथील सामाजिक कार्यकर्ते महेशकुमार पांडुरंग घनगाव यांना स्टार आयकॉन पुरस्कार सुमन आर्ट थिएटर्स यांच्या वतीने हैदराबाद येथे तेलंगणा विधानसभा सभापती एस. मधुसूदना चारी गारु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. घनगाव यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आला.

मूर्तिजापूर येथे स्वाभिमान दिवस साजरा

मूर्तिजापूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी मूर्तिजापूरच्या वतीने स्वाभिमान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी पीएसआय शिंदे, तालुका उपाध्यक्ष संजय तायडे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष योगीता सुनील वानखडे, ज्येष्ठ नेते प्रधान, राहुल महाजन, तालुका निरीक्षक मनोज तायडे, महेंद्र तायडे आदी उपस्थित होते.

Web Title: Awareness about soybean seed use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.