बंग दाम्पत्याला पुरस्कार
By Admin | Updated: April 3, 2016 15:42 IST2016-04-03T15:42:27+5:302016-04-03T15:42:27+5:30
अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स या प्रतिष्ठीत विद्यापीठातर्फे देण्यात येणारा 'डिस्टिंग्विश्ड अँलुम्नस' हा पुरस्कार २0१६ या वर्षासाठी समाजसेवक डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना देण्यात येणार आहे.

बंग दाम्पत्याला पुरस्कार
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. ३ - अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स या प्रतिष्ठीत विद्यापीठातर्फे देण्यात येणारा 'डिस्टिंग्विश्ड अँलुम्नस' हा पुरस्कार २0१६ या वर्षासाठी समाजसेवक डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना देण्यात येणार आहे. आपल्या कार्यातून विद्यापीठाची परंपरा जोपासणार्या व आपल्या ज्ञानाचा वापर समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी करून विद्यापीठाचे नाव उज्वल करणार्या विद्यार्थ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
यापूर्वी २0१३ साली याच विद्यापीठाच्या सोसायटी ऑफ स्कॉलर्स या सर्वोच्च पुरस्कारासाठी तसेच आंतरराष्ट्रीय आरोग्य विभागातर्फे देण्यात येणार्या पहिल्या अँलुम्नस पुरस्काराने बंग दाम्पत्यांना गौरविण्यात आले होते. डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी सार्वजनिक आरोग्य सेवा परिणामकारकरित्या कशी करावी हे शिकण्यासाठी त्यांनी फोर्ड फेलोशीप अंतर्गत १९८३ साली अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात एमपीएचचे शिक्षण घेतले. येथे त्यांना डॉ. डोनाल्ड हेंडरसन व डॉ. कार्ल टेलर या सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्या दोन दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले.
बालमृत्यूच्या प्रश्नावर त्यांनी शोधलेले 'घरोघरी नवजात बालसेवा' हे मॉडेल जगभरातील अविकसीत देशांमध्ये व भारतात नऊ लाख आशांद्वारे बालमृत्यू कमी करण्यासाठी वापरले जात आहे. सर्च संस्थेचे कार्य व कार्यपध्दती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असून विद्यार्थ्यांना 'केस स्टडी' म्हणून शिकवले जात आहे.