अकोला जिल्ह्यात सरासरी ८.४६ मि.मी.पाऊस
By Admin | Updated: September 4, 2014 01:36 IST2014-09-04T01:36:18+5:302014-09-04T01:36:38+5:30
गेल्या चोवीस तासात बुधवारी सकाळी ८ वाजे पर्यंत जिल्ह्यात सरासरी ८.४६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

अकोला जिल्ह्यात सरासरी ८.४६ मि.मी.पाऊस
अकोला: गेल्या चोवीस तासात बुधवारी सकाळी ८ वाजे पर्यंत जिल्ह्यात सरासरी ८.४६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात सार्वत्रिक आणि दमदार पाऊस झाल्याने, शेतकरी सुखावला आहे.
जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात असतानाच गेल्या रविवारी जिल्ह्यातील सातही तालुक्यात सार्वत्रिक व दमदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मंगळवारीदेखील जिल्हाभरात सार्वत्रिक रिमझिम पाऊस बरसला. सर्वत्र दमदार पाऊस बरसलेला पाऊस िपकांसाठी उपयुक्त ठरला असून, जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठयातही वाढ झाली आहे.
गेल्या २४ तासांत अर्थात बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८.४६ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली. त्यामध्ये अकोला २५, आकोट ११.२0, तेल्हारा ६, बाळापूर ८ आणि मूर्तिजापूर तालुक्यात ९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते; मात्र सायंकाळ पर्यंत पावसाने हजेरी लावली नाही.
मागील दोन दिवसात झालेल्या पावसाच्या दमदार हजेरीने शेतकरी सुखावला आहे; मात्र जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठय़ात पुरेसा जलसाठा उपलब्ध होण्यासाठी धरणांच्या जलग्रहण क्षेत्रात आणखी जोरदार पावसाची प्र तीक्षा केली जात आहे.
*महान धरणातील जलसाठा २६.९७ टक्क्यावर!
गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या महान येथील काटेपूर्णा धरणातील जलसाठय़ात मंगळवारी वाढ झाली. बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंंत काटेपूर्णा धरणातील जलसाठा २६.९७ टक्क्यांवर पोहोचला. तर मोर्णा धरणात ४२.0७ टक्के, निगरुणा धरणात ७७.४५ टक्के, उमा धरणात १७.३२ टक्के जलसाठा उपलब्ध होता. वान धरणात ९0. २४ टक्के जलसाठा उपलब्ध झाल्याने या धरणाचे दोन दरवाजे प्रत्येकी १0 से.मी. उघडण्यात आले असून, दगडपारवा धरणातील जलसाठा लघुत्तम पातळीखालीच असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.