शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आता २३१ तालुक्यात पावसाने ओलांडली सरासरी!

By admin | Updated: August 6, 2016 01:46 IST

ऑगस्ट महिन्यातही पाऊस, पण दोन तालुक्यात २५ ते ५0 टक्केच पाऊस.

अकोला, दि. ५: यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात सरासरीच्या १0९ टक्के पाऊस झाला आहे. ३५५ तालुक्यापैकी २३१ तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. १३९.६४ लाख हेक्टरपैकी १३५.0२ लाख हेक्टर म्हणजेच ९७ टक्के पेरण्या आटोपल्या असून, पीकपरिस्थिती सर्वत्र उत्तम आहे; परंतु दोन तालुक्यात २५ ते ५0 तर २६ तालुक्यात केवळ ५0 ते ७५ टक्के पाऊस झाला आहे.यावर्षी दमदार सार्वत्रिक पावसामुळे सर्वत्र पिके बहरली आहेत. भात व नाचणी पिकाच्या पुनर्लागवडीची कामे प्रगतिपथावर आहेत. राज्यातील सर्वच विभागात पेरण्या प्रगतिपथावर आहेत. ऑगस्टच्या प्रथम आठवड्यात कोकणात ४७ तालुक्यांपैकी ९ तालुक्यात ७५ ते १00 टक्के, तर ३८ तालुक्यात १00 टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला असून, खरिपातील ४.८७ हेक्टरपैकी ३.६९ लाख हेक्टर म्हणजेच ७६ टक्के क्षेत्रावर पेरणी व लागवड झाली आहे. नाशिक विभागातील ४0 तालुक्यांपैकी एका तालुक्यात २५ ते ५0 टक्के, ८ तालुक्यात ५0 ते ७५ टक्के, १८ तालुक्यात ७५ ते १00 टक्के तर १३ तालुक्यात १00 टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या विभागात खरिपाच्या २१.५१ लाख हेक्टरपैकी १९.८६ लाख हेक्टर म्हणजेच ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली. पुणे विभागात ३९ तालुक्यापैकी २३ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला आहे. पुणे विभागात खरिपाचे ७.३९ हेक्टर क्षेत्र आहे; पण यावर्षी ९.३६ लाख हेक्टर म्हणजेच १२७ टक्के पेरणी झाली. कोल्हापूर विभागातील ३३ तालुक्यांपैकी २२ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला. या विभागात खरिपाचे ८.0६ लाख हेक्टर क्षेत्र आहे; पण ८.२९ लाख हेक्टर म्हणजेच १0३ टक्के पेरणी झाली आहे. औरंगाबाद विभागातील २८ तालुक्यांपैकी १९ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला आहे. या विभागात खरिपाचे १८.८७ लाख हेक्टर क्षेत्र आहे. तथापि, यावर्षी २0.६९ लाख म्हणजेच ११0 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. लातूर विभागातील ४८ तालुक्यापैकी ३८ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला असून, खरिपाच्या २७.२७ लाख हेक्टरपैकी २६.३९ हेक्टर म्हणजेच ९७ टक्के पेरणी झाली आहे. अमरावती विभागातील ५६ तालुक्यापैकी ४७ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला असून, ३२.६८ लाख हेक्टरपैकी ३१.९९ लाख हेक्टर म्हणजेच ९८ टक्के पेरणी आटोपली आहे. नागपूर विभागातील ६४ तालुक्यापैकी ३१ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला आहे. खरिपाच्या १८.९८ लाख हेक्टरपैकी १४.७४ लाख म्हणजेच ७८ टक्के पेरणी झाली आहे. "अमरावती विभागात पावसाने जुलै महिन्यातच सरासरी ओलांडली आहे. पिके उत्तम आहेत. शेतकर्‍यांना आता मशागतीसाठी काही दिवस उघडीप हवी आहे."- एस.आर. सरदार,विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.