भरधाव पीकअपची ऑटोला धडक
By Admin | Updated: April 25, 2015 02:18 IST2015-04-25T02:18:29+5:302015-04-25T02:18:29+5:30
महिला ठार; तर तीघे गंभीर जखमी

भरधाव पीकअपची ऑटोला धडक
खामगाव (जि. बुलडाणा) : भरधाव पीकअप वाहनाने ऑटोला धडक दिल्याने महिला ठार तर तीनजण जखमी झाले. ही घटना २४ एप्रिल रोजी रात्री १0.३0 वाजताचे सुमारास खामगाव-शेगाव रस्त्यावर सिध्दीविनायक टेक्निकल क ॅम्पसनजीक घडली. खामगाव येथील पारेख परिवारातील सदस्य शेगाव येथून ऑटोने खामगाव येथे असताना त्यांना उपरोक्त ठिकाणी समोरुन भरधाव येणार्या विनाक्रमांकाच्या नवीन बोलेरो वाहनाने धडक दिली. या अपघातात ऑटोतील प्रवासी कांता विजयकुमार पारेख (वय ४५) ह्या जागीच ठार झाल्या. तसेच ऑटोमधील सरिता राजेश पारेख, शिवम राजेश पारेख(वय १६), हिरा नंदलाल फुटाणी (वय ३५) हे तिघे गंभीर जखमी झाले. या जखमींना उपचारासाठी स्थानिक सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सामान्य रुग्णालयात गर्दी झाली होती. तसेच काहींनी अनियंत्रीतपणे वाहन चालविणार्या पिकअपवाहन चालकाचा पाठलाग केला. मात्र तो पसार होण्यात यशस्वी झाला. या घटनेतील पिकअपवाहन चालक हा नशेत असल्याचे तसेच भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवित असल्याची माहिती प्रत्यक्षदश्रीनी दिली. तसेच ऑटोला धडक दिल्यानंतर पिकअप वाहनचालकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडाच्या धडक दिली. या घटनेनंतर पिकअपवाहनचालक घटनास्थळावरुन पसार झाला. वृत्त लिहिपर्यंत पोलिसांची गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.