मुलीच्या प्रसंगावधानामुळे फसला अपहरणाचा प्रयत्न
By Admin | Updated: February 7, 2015 02:08 IST2015-02-07T02:08:55+5:302015-02-07T02:08:55+5:30
सौंदळा येथील घटना.

मुलीच्या प्रसंगावधानामुळे फसला अपहरणाचा प्रयत्न
हिवरखेड (जि. अकोला): सौंदळा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणार्या अल्पवयीन विद्यार्थिनीला एका युवकाने मोटारसायकलवरून पळवून नेण्याचा प्रयत्न ६ फेब्रुवारीला सकाळी १0.३0 वाजताच्या दरम्यान केला. सदर विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखत मोटारसायकलवरून उडी घेतल्याने अपहरणाचा प्रयत्न फसला. सौंदळा येथील एका शेतात राहणार्या मजुराची मुलगी सकाळी घरून शाळेत जाण्याकरिता निघाली असता, वारखेड कालव्यानजीक एक मोटारसायकलस्वाराने तिला मोटारसायकलवर सौंदळा येथे सोडण्याचे सांगत दुचाकीवर बसविले. मात्र, तो वेगळ्याच दिशेने जात असल्याचे लक्षात आल्यावर विद्यार्थिनीने धावत्या मोटारसायकलवरून खाली उडी घेतली.