कोरोना काळातील कमी सुधारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:19 IST2021-02-05T06:19:04+5:302021-02-05T06:19:04+5:30
-प्रा. हेमंत इंगळे, आरोग्य यंत्रणा बळकट करणारा अर्थसंकल्प अर्थसंकल्पात आरोग्यासाठी १३७ टक्के बजेट वाढविण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रतिबंधात्मक ...

कोरोना काळातील कमी सुधारण्याचा प्रयत्न
-प्रा. हेमंत इंगळे,
आरोग्य यंत्रणा बळकट करणारा अर्थसंकल्प
अर्थसंकल्पात आरोग्यासाठी १३७ टक्के बजेट वाढविण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला असून, त्या अनुषंगाने पावले उचलण्यात आल्याचे आजच्या अर्थसंकल्पावरून दिसून येते, तसेच पोषण आहाराच्या नियोजनालाही बजेटमध्ये स्थान देण्यात आले आहे.
- डॉ. सागर थोटे, फुप्फुसरोग तज्ज्ञ, अकोला
कोरोनाकाळात समोर आलेल्या उणिवा भरून काढण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केलेला दिसून येतो. मात्र, काही गोष्टींवर कर वाढविण्यात आल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसण्याचे संकेत या अर्थसंकल्पातून मिळत आहेत. इतर बाबतींत अर्थसंकल्प चांगला असला, तरी महागाई नियंत्रणात आणण्यासाठी तरतूद आवश्यक होती.
- कोमल खरप, गृहिणी
अर्थसंकल्पात शिक्षणासोबतच आरोग्य विभागासाठी भरीव तरतूद केली आहे. कोरोनाकाळानंतर या दोन्ही क्षेत्रांना बळकट करणे आवश्यक होते, तसेच नवीन शिक्षण नूतीच्या अनुषंगाने या निमित्ताने पाऊल टाकले आहे. मात्र, काही प्रमाणात महागाई वाढण्याची चिन्हेही दिसत असल्याने सर्वसामान्यांना त्याचा फटका बसणार आहे.
- अविनाश क्षीरसागर, युवक