विलगीकरण कक्षात असलेल्या रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:17 IST2021-05-01T04:17:28+5:302021-05-01T04:17:28+5:30

मूर्तिजापूर : येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातील कोविड विलगीकरण कक्षात उपचारार्थ असलेल्या ६५ वर्षीय रुग्णाने रुग्णालयाच्या दुसऱ्या माळ्यावरून ...

Attempted suicide of a patient in the isolation ward! | विलगीकरण कक्षात असलेल्या रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न!

विलगीकरण कक्षात असलेल्या रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न!

मूर्तिजापूर : येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातील कोविड विलगीकरण कक्षात उपचारार्थ असलेल्या ६५ वर्षीय रुग्णाने रुग्णालयाच्या दुसऱ्या माळ्यावरून मागच्या बाजूला खाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास घडली. काही दिवसांपूर्वी तपासणीदरम्यान या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना हेंडज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात असलेल्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर तेथून लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयातील कोविड अलगीकरण कक्षात शुक्रवार, दि. ३० एप्रिल रोजी दुपारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; परंतु कंटाळून त्याने दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास रुग्णालयातील वरच्या मजल्यावरून पायऱ्यांच्या बाजूला असलेल्या खुल्या खिडकीतून स्वतःला खाली झोकून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लगेच सारवासारव करण्यात आली असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात हा व्यक्ती जखमी झाला असून, त्याच्या हाताला व चेहऱ्यावर दुखापत झाली आहे.

-------

हेंडज येथील कोविड सेंटरमधून शुक्रवारीच त्या व्यक्तीला येथील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्याने रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तो पायऱ्यावरून घसरून जखमी झाला. उपचार करून पुन्हा विलगीकरणात ठेवण्यात आले.

-राजेंद्र नेमाडे, सहायक वैद्यकीय अधिकारी, लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर

Web Title: Attempted suicide of a patient in the isolation ward!