वाडेगाव येथे सराफा दुकानात चोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:20 IST2021-09-27T04:20:46+5:302021-09-27T04:20:46+5:30

येथील बसस्थानक परिसरात असलेल्या न्यू लक्ष्मी ज्वेलर्स या सराफा दुकानात शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानावर चढून टिनपत्रे व ...

Attempted robbery at a bullion shop at Wadegaon | वाडेगाव येथे सराफा दुकानात चोरीचा प्रयत्न

वाडेगाव येथे सराफा दुकानात चोरीचा प्रयत्न

येथील बसस्थानक परिसरात असलेल्या न्यू लक्ष्मी ज्वेलर्स या सराफा दुकानात शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानावर चढून टिनपत्रे व प्लायवूड काढून दुकानात प्रवेश केला. दुकानातून काहीही साहित्य किंवा दागिने नसल्याने चोरीचा प्रयत्न फसला आहे. याबाबत नितेश रमेशराव कर्हे यांनी वाडेगाव पोलीस चौकीला तक्रार दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक चोरटा दुकानात, तर दुसरा टिनावर दिसून येत आहे. चोरीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

--------------------------

एकाच दुकानात तिसऱ्यांदा चोरी

एकाच दुकानात वर्षातून तिसऱ्यांदा चोरी झाल्याने दुकानदार भयभीत झाले आहेत. पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन परिसरात गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

Web Title: Attempted robbery at a bullion shop at Wadegaon