शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
4
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
5
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
6
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
7
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
8
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
9
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
10
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
11
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
12
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
13
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
14
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
15
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
16
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
17
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
18
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
19
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
20
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

एचटीबीटी बियाण्यांसाठी शेतकऱ्याला अडकविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 10:05 IST

शेतकऱ्यांना खोट्या प्रकरणात फसविण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.

ठळक मुद्दे जाफरखा आमदखा यांना डमी व्यक्तीद्वारे फोन करून एचटीबीटी बियाण्यांची मागणी केली.बियाणे वा माल न सापडल्याने जाफरखा यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार कृषी विभागाने केली नाही.

अडगाव बु : शासनमान्यता नसलेले प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे अडगाव बु. येथे विकले जात असल्याच्या माहितीवरून कृषी विभागाने रचलेला सापळा अयशस्वी ठरला. दुसरीकडे शेतकऱ्यांना खोट्या प्रकरणात फसविण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.कृषी विभागाच्या अधिकाºयांनी अडगाव बु. येथील जाफरखा आमदखा यांना डमी व्यक्तीद्वारे फोन करून एचटीबीटी बियाण्यांची मागणी केली. त्यानुसार अडगाव बु. बसस्टँडवर सदर व्यक्तीला बोलवण्यात आले. त्यानंतर कृषी अधिकाºयांनी पोलिसामार्फत सदर व्यक्तीला सोबत घेतले; परंतु कोणत्याही प्रकारचे बियाणे वा माल न सापडल्याने जाफरखा यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार कृषी विभागाने केली नाही. आम्ही रचलेल्या सापळ्यात मुद्देमाल न सापडल्याने तक्रार देत नसल्याचे कृषी अधिकाºयांनी ठाणेदार आशीष लव्हांगळे यांना सांगितले. यावेळी जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी नितीन लोखंडे, जिल्हा मोहीम अधिकारी जंवजाळ, तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे, व पंचायत समिती कृषी अधिकारी भारतसिंग चव्हाण हे हजर होते. दुसरीकडे या प्रकरणात कृषी विभागाने शेतकºयाला फसवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा हा प्रयत्न फसला असल्याची बाब शेतकरी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनातून व्यक्त करण्यात आली. गेल्या वर्षी अडगाव बु. शेतशिवारात सविनय कायदेभंग करीत शेतकरी संघटनेच्या वतीने तंत्रज्ञान स्वतंत्रता आंदोलन छेडण्यात आले होते. यात शेतकºयांनी खुलेआम प्रतिबंधित असलेल्या एचटीबीटी बियाण्यांची जाहीर पेरणी केली होती. त्यावेळी २५ जून २०१९ ला अकोट व हिवरखेड पोलिसांनी शेतकरी संघटनेच्या १६ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणाचा हवाला देत शेतकरी संघटनेने कृषी विभाग कार्यकर्त्यांना नाहक त्रास देत असल्याचा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केले आहे. शेतकरी संघटनेचे नेते ललित बहाळे, माहिती व तंत्रज्ञान आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकार, तालुका प्रमुख नीलेश नेमाडे, युवा आघाडीचे दिनेश देऊळकार, मंगेश रेळे, दिनेश गिºहे, मकसूद मुल्लाजी इत्यादी कार्यकर्त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाºयांना कृषी सेवा केंद्रांमध्ये अवैध औषधी व खतांचा साठा आहे, त्यावर आपण कारवाई करावी, अशी मागणी केली; परंतु त्यावर कृषी अधिकाºयांनी उत्तर देण्याचे टाळले. या प्रकरणाची शेतकरी संघटनेने दखल घेतली असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून लवकरचआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अडगाव बु. येथे अनधिकृतरीत्या एचटीबीटी बियाणे विकले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार संबंधित व्यक्तीकडे एचटीबीटी बियाण्यांची मागणी केली असता सदर व्यक्तीने बियाणे घेण्यासाठी अडगाव बु. बसस्टँडवर बोलावले. त्यानुसार सापळा रचून पकडण्याचा प्रयत्न केला असता सापळा अयशस्वी झाला, त्यामुळे कारवाई करता आली नाही. सदर व्यक्तीच्या भ्रमणध्वनीवर झालेल्या संभाषणाचे पुरावे आहेत.- भरतसिंग चव्हाण, कृषी अधिकारी, पं. स. तेल्हारा

अडगाव बु. मधून किती तरी शेतकरी एचटीबीटी बियाण्यांबाबत कॉल आल्याचे सांगतात; पण पुढे येण्यास घाबरतात. अशाप्रकारे विविध ठिकाणच्या शेतकºयांनी दिलेल्या माहितीनुसार एचटीबीटी बियाणे उपलब्ध असल्याचा संशय आल्याने अडगाव बु. येथे सापळा रचण्यात आला होता. बियाणे पुरावा हाती न लागल्याने तक्रार नोंदवली नाही.- मिलिंद वानखडे,तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा

 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी