अतिक्रमकांचा महापालिकेच्या पथकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:07 PM2018-09-18T12:07:36+5:302018-09-18T12:11:04+5:30

अकोला: टॉवर चौकात अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर अतिक्रमकांनी दगडफेक करून मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याची घटना सोमवारी टॉवर चौकात घडली.

Attack on NMC's team of encroachers | अतिक्रमकांचा महापालिकेच्या पथकावर हल्ला

अतिक्रमकांचा महापालिकेच्या पथकावर हल्ला

Next
ठळक मुद्दे दुकाने हटविण्याची कारवाई सुरू असताना एका व्यक्तीला जेसीबीचा धक्का लागला.निमित्त साधून इतर फूल विके्रत्यांनी अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाºयांवर दगडफेक करून मारहाण केली. संबंधित मनपा कर्मचाºयांनी फूल विक्रेत्यांविरोधात तक्रार देण्यासाठी सिव्हिल लाइन पोलीस ठाणे गाठले.

अकोला: टॉवर चौकात अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर अतिक्रमकांनी दगडफेक करून मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याची घटना सोमवारी टॉवर चौकात घडली. याप्रकरणी मारहाण करणाºया फूल विके्रत्यांविरोधातील पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी चांगलीच धावाधाव केली. अखेर मनपा कर्मचाºयांना विनंती करून माफीनामा लिहून देण्याची वेळ काँग्रेसच्या नगरसेवकांवर आल्याची माहिती आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर बिनदिक्कतपणे व्यवसाय थाटणाºया अतिक्रमकांमुळे अकोलेकर वैतागले आहेत. मुख्य बाजारपेठसह रस्त्यांलगत ठिकठिकाणी लघु व्यावसायिक, फे रीवाल्यांनी विविध साहित्य विक्रीची दुकाने थाटली आहेत. वाढत्या अतिक्रमणाला कंटाळलेल्या अकोलेकरांचा रोष पाहता महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्यावतीने दररोज मुख्य मार्गावरील अतिक्रमकांना हुसकावण्याची कारवाई केली जात आहे. सोमवारी टॉवर चौकातील एसबीआयच्या आवारभिंतीलगत फूल विके्रत्यांची दुकाने हटविण्याची कारवाई सुरू असताना एका व्यक्तीला जेसीबीचा धक्का लागला. त्यामध्ये सदर इसमाच्या कानाला दुखापत झाली. निमित्त साधून इतर फूल विके्रत्यांनी अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाºयांवर दगडफेक करून मारहाण केली. या मारहाणीत कर्मचाºयांना किरकोळ मार लागला. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधित मनपा कर्मचाºयांनी फूल विक्रेत्यांविरोधात तक्रार देण्यासाठी सिव्हिल लाइन पोलीस ठाणे गाठले. त्यावेळी काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी धाव घेऊन प्रकरण आपसात घेण्यासाठी प्रयत्न केले.

आधी दबाव नंतर माफीनामा!
टॉवर चौकात काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविकेच्या पतीने मनपा कर्मचाºयांवर दबावतंत्राचा वापर केला. सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात आणखी तीन नगरसेवकांनी धाव घेऊन तक्रार मागे घेण्यासाठी सुरुवातीला दबाव आणला. तरीही कर्मचारी तक्रारीवर ठाम असल्याचे पाहून अखेर संबंधित फूल विके्रत्यांनी माफीनामा लिहून दिल्याची माहिती आहे.

कारवाई सुरूच राहणार!
शहराच्या गल्लीबोळात चक्क रस्त्यांवर अतिक्रमकांनी दुकानांचा बाजार मांडला आहे. यामुळे रस्त्यावरून धड चालणेही मुश्कील झाले आहे. वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार असल्याचे अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहाद्दूर यांनी स्पष्ट केले आहे.

 

Web Title: Attack on NMC's team of encroachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.