शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात मारेकऱ्यांचा घरावर हल्ला; वाहनांची तोडफोड अन दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 12:58 IST

अकोला : सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याचे हद्दीतील न्यू तापडिया नगरमध्ये असलेल्या प्रथमेश नगरातील एका घरावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली.

अकोला : सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याचे हद्दीतील न्यू तापडिया नगरमध्ये असलेल्या प्रथमेश नगरातील एका घरावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. घरासमोर उभ्या असलेल्या कारवरही मोठे दगड फेकण्यात आले. त्यामुळे कारच्या काचा फुटल्या असून या कारमधील 4 लाखांची रोकड मारेकऱ्यांनी पळविल्याची माहिती आहे. 

न्यू तापडिया नगरातील प्रथमेश नगरमध्ये हेमंत बघिरथ मिश्रा हे रहिवासी असून ते एक खासगी एजनिसिद्वारे बँकांची थकीत वसुलीचे कामकाज करीत असल्याची माहिती समोर आली आहे.  ते रविवारी कामावरून परत आल्यानंतर वसुलीचे 4 लाख रुपये कारमध्येच ठेऊन घरात गेले. बाहेरील गेटला कुलूप लावून ते घरामध्ये गेल्यानंतर 3 अज्ञात मारेकऱ्यांनि त्यांच्याघरासमोर उभ्या असलेल्या महागड्या वाहनांवर दगडफेक करून त्याच्या काचा फोडल्या. तर सदर घरावरही दगडफेक करण्यात आली. रविवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान अज्ञात मारेकऱ्यांनी सदर घरावर दगडफेक करून हल्ला चढवल्याची माहिती सिव्हिल लाइन्स पोलिसांनी दिली. यामध्ये घरातील काही जण जखमी झाल्याची माहिती असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन्स पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. सदर दगडफेक आणि तोडफोडीचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे. यासोबतच दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्यांची माहिती समोर पोलिसांनी घेण्यासाठी तपस सुरू केला असून सदर तिन्ही आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याची माहिती आहे.हल्लेखोर जिल्ह्यातून तडीपारहेमंत मिश्रा यांच्या निवासस्थानी दगडफेक करीत हल्ला करणाऱ्या तीन आरोपींमधील 2 आरोपी जिल्ह्यातुन तडीपार असल्याची माहिती आहे. हे आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने त्यांची चेहरे पोलिसांसमोर आले असून कुख्यात आरोपी असल्याचे पोलिसांचे म्हणे आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस