चिमुकलीवरील अत्याचार; आरोपी कारागृहात

By Admin | Updated: April 23, 2017 08:53 IST2017-04-23T08:53:56+5:302017-04-23T08:53:56+5:30

चिमुकलीवर अत्याचार करणाºया एकाची शनिवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Atrocities on the Chimukulla; The accused sentenced to jail | चिमुकलीवरील अत्याचार; आरोपी कारागृहात

चिमुकलीवरील अत्याचार; आरोपी कारागृहात

अकोला : चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या एकाची शनिवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली, तर यातील मुख्य दोन आरोपी २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. टिळक रोडवर त्रिवेणेश्वर व्यापारी संकुलाच्या माळ्यावर गोविंद साखरे याने दहा वर्षांच्या मुलीला पैशांचे आमिष दाखवून पाठविले होते. ती मुलगी माळ्यावर जाताच येथे उपस्थित असलेल्या शेख मुस्तकीन कुरेशी अ. जाकीर कुरेशी व मोहसीन कुरेशी मो. अन्वर कुरेशी या दोघांनी तिला पकडून अत्याचार केला होता. चिमुकली रक्ताने माखलेले कपडे अंगाला गुंडाळून प्रचंड भयावह अवस्थेत खाली येत असताना व्यापाऱ्यांना दिसली. उपस्थितांनी तिला पाहताच रामदासपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. गुन्हा दाखल करून पोलिसांनी या सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपी गोविंद साखरे यास अटक केल्यानंतर प्रवीण चव्हाण यालाही पोलिसांनी अटक केली होती; मात्र चव्हाण हा या प्रकरणात आरोपीच नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट करीत या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख मुस्तकीन व मोहसीन कुरेशी या दोघांना पोलिसांनी अटक केली; मात्र चव्हाण हा पोलीस कोठडीत असल्याने त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने चव्हाणची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत. या अत्याचार प्रकरणातील दोन मुख्य आरोपींची सोमवारी पोलीस कोठडी संपणार आहे.

Web Title: Atrocities on the Chimukulla; The accused sentenced to jail