विवाहित महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2016 01:14 IST2016-04-17T01:14:50+5:302016-04-17T01:14:50+5:30
एका महिलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा.

विवाहित महिलेवर अत्याचार
हिवरखेड (जि. अकोला): अडगाव बु. येथील २३ वर्षीय विवाहितेवर अत्याचार झाल्याचे शुक्रवारी रात्री अकोला जिल्ह्यातील अडगाव बु. येथे उजेडात आले. याप्रकरणी गावातील एका महिलेसह पाच जणांविरुद्ध हिवरखेड पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्या त आला. अडगाव येथील इंदिरानगरामध्ये राहणारी २३ वर्षीय मागासवर्गीय महिलेवर ९ ते २९ मार्च दरम्यान सतत अत्याचार करण्यात आले. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ९ मार्चच्या रात्री ८ वाजता सुमारास तिचा लहान मुलगा खेळत होते. तेवढय़ात शमशादबी शेख सलीम या महिलेने पीडित महिलेला तिच्या घरी नेले. त्या ठिकाणी असलेला मतीन याने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर गावातीलच शेख वहीद अब्दुल रफीक, साजित ऊर्फ सांबा मुलतान ऊर्फ लाला यांनीसुद्धा संगनमताने सदर महिलेवर वारंवार अत्याचार केला. पीडित महिलेचा पती हा बंगळुरु (कर्नाटक) येथे नोकरी करीत असल्यामुळे ती चिमुकल्या मुलासह अडगाव येथे राहत होती. शुक्रवारी पती परतल्यानंतर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. उपरोक्त पाच जणांविरुद्ध भादंविचे कलम ३७६, ड, ३५४, ४५२, अँट्रासिटी अँक्ट, ३ (१), ११३ (१) (१२) व २0१५ कायद्याअंतर्गत ३ (डब्ल्यू) १, ३ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एसडीपीओ राजेंद्र मनवरे, ठाणेदार सुधाकर देशमुख, पीएसआय हेमंत चौधरी करीत आहेत.