एटीएममधून उडवले ४८ हजार!

By Admin | Updated: November 5, 2015 01:44 IST2015-11-05T01:44:57+5:302015-11-05T01:44:57+5:30

सायबर गुन्हे दाखल; बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी करून फसवणूक.

ATMs fly over 48 thousand! | एटीएममधून उडवले ४८ हजार!

एटीएममधून उडवले ४८ हजार!

मोताळा (जि. बुलडाणा) : शहरापाठोपाठ मोताळा परिसरात सायबर गुन्हय़ांचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. शहरालगतच्या बोराखेडी येथील शेतकर्‍याच्या मोबाइलवर अज्ञात ठगाने फोन करून बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून एटीएम क्रमांक घेऊन खात्यातून १२ हजार रुपये काढून फसवणूक केली. ही घटना सोमवार २ नोव्हेंबर रोजी घडली, तर दुसर्‍या घटनेत बोराखेडी येथील मलकापूर आगारात बस चालक म्हणून कार्यरत असणारे दिलीप सदाशिव नारखेडे यांच्या खात्यातून याच पद्धतीने अज्ञात ठगाने ३६ हजार रुपये काढले. बोराखेडी येथील शेतकरी प्रल्हाद दगडू मोरे यांच्या मोबाइलवर फोन करून वरिष्ठ बँक अधिकारी बोलत असल्यासे भासवून त्यांच्या एटीएमचा पासवर्ड घेतला व लगेचच त्यांच्या खात्यातील १२ हजार रुपये काढून घेतले. पैसे काढल्याचा मॅसेज आल्यावर प्रल्हाद मोरे यांनी स्टेट बँकेत चौकशी केली असता, अज्ञात भामट्याने फसविल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
एटीएम खात्यातून रक्कम लांबविल्याची दुसरी घटना १२ ऑक्टोबर रोजी घडली होती. बोराखेडी येथील मलकापूर आगारात बसचालक असलेले दिलीप नारखेडे यांच्या ९९२२१३३0४४ या मोबाइल क्रमांकावर मलकापूर स्टेट बँकेच्या शाखेतून वरिष्ठ अधिकारी बोलतो, असे म्हणत एका अज्ञात भामट्याने १0१0२६५२३९६ या मोबाइल क्रमांकावरून फोन केला, तुमचे एटीएम कार्ड बंद झाले आहे. एटीएमचा पीन क्र मांक सांगा. नारखेडे यांनी पूर्ण माहिती सांगितल्यावर त्या भामट्याने तुम्हाला नवीन पासवर्ड मिळेल, असे सांगून फोन बंद केला. त्यावेळी अवघ्या १0 मिनिटांत त्यांच्या मोबाइलवर ३६ हजार रुपये काढल्याचा संदेश धडकला. नारखेडे यांनी स्टेट बँक शाखेत चौकशी केली असता, त्यांना फसवणूक झाल्याचे सांगत पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला बँकेने दिला.

 

Web Title: ATMs fly over 48 thousand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.