एटीएम क्रमांक विचारून केली फसवणूक

By Admin | Updated: December 11, 2014 01:03 IST2014-12-11T01:03:19+5:302014-12-11T01:03:19+5:30

बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून तब्बल ३३ हजार १९0 रुपयांची केली ऑनलाईन खरेदी.

ATM number asked fraud | एटीएम क्रमांक विचारून केली फसवणूक

एटीएम क्रमांक विचारून केली फसवणूक

अकोला: जुने शहरातील किल्ला चौकाजवळ राहणारे संदीप राधेश्याम गांधी यांच्या तक्रारीनुसार त्यांचे गोरक्षण रोडवरील बँक ऑफ इंडियामध्ये एटीएम बचत खाते आहे. रविवारी, ७ डिसेंबर रोजी त्यांना ९१७७६३८२८८0९ या क्रमांकावरून फोन आला. या फोनवरील बोलणार्‍या व्यक्तीने बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून गांधी यांना तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. ते सुरू करण्यासाठी एटीएमचा सोळा अंकी क्रमांक सांगण्याविषयी विनंती केली. गांधी यांनी त्याच्या भुलथापांना बळी पडून त्यांच्या एटीएमचा सोळा अंकी क्रमांक सांगितला. दुसर्‍याच दिवशी गांधी यांच्या खात्यातून तब्बल ३३ हजार १९0 रुपये ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून काढण्यात आले. ही माहिती मिळताच गांधी यांनी पोलीस केली. त्यावरून जुने शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Web Title: ATM number asked fraud