शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

संशोधनासाठी अटल कार्निवल विद्यार्थ्यांना संधी! - कुलगुरू डॉ. विलास भाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 12:32 IST

अकोला: देशभरातील शाळांमध्ये अटल टिकरिंग लॅब उभारून नीती आयोगाने विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्याचा प्रयत्न केला, तसेच विद्यार्थ्यांसाठी अटल कार्निवल मोठी संधी आहे.

अकोला: देशभरातील शाळांमध्ये अटल टिकरिंग लॅब उभारून नीती आयोगाने विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्याचा प्रयत्न केला, तसेच विद्यार्थ्यांसाठी अटल कार्निवल मोठी संधी आहे. कार्निवलद्वारे विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा आणि समाजाच्या उपयोगी संशोधन करावे, असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केले.स्कूल आॅफ स्कॉलर्समध्ये अटल टिकरिंग लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या अटल कार्निवल विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अटल मेंटॉर दिलीप ठोसर, डीएमआयएमएस वर्धा येथील डॉ. नाजिली काजी, मेघे आॅफ ग्रुपचे सीईओ डॉ. सचिन उंटवाले, वायसीसीईचे अधिष्ठाता डॉ. ए.व्ही. बापट, संचालक आभा मेघे, अजिंक्य अंबारखाने, एसओएस अमरावतीचे मुख्याध्यापक सुरेश लकडे, मुख्याध्यापिका मनीषा उंबरकर उपस्थित होते.कुलगुरू डॉ. भाले म्हणाले, अटल लॅब उभारण्यामागे विद्यार्थ्यांच्या संशोधन व वैज्ञानिक वृत्तीला चालना देण्याचा प्रयत्न आहे. दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून स्कूल आॅफ स्कॉलर्स शाळा नीती आयोगाच्या या उद्देशामध्ये सहभागी होत आहे आणि शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. ही कौतुकास्पद बाब आहे, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी संचालक अजिंक्य अंबारखाने, मुख्याध्यापिका मनीषा उंबरकर यांनी मनोगत व्यक्त केले. अटल कार्निवलमध्ये देशभरातून २0 शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विविध वैज्ञानिक दृष्टिकोनातून ६0 वैज्ञानिक प्रकल्पांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांद्वारा मांडण्यात आले आहे. स्कूल आॅफ स्कॉलर्स शाळेकडून विद्यार्थ्यांना कार्यशाळेसाठी आवश्यक साहित्य मोफत उपलब्ध करून दिले आहे. विज्ञान प्रदर्शनामध्ये गेम झोन, सेल्फी पॉइंट, थ्रीडी प्रिंटर, ड्रोन आदी आकर्षण आहेत. अटल कार्निवलच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय अधिकारी राजेश कड, उपमुख्याध्यापिका कोमल लहरिया, अटल विभाग प्रमुख भानुदास तिव्हाळे, घनश्याम पुºहाड, शुभांगी मिरगे, नयना मुलक, अनघा लोथे, राजेंद्र डोंगरे व राहुल वानखडे प्रयत्न करीत आहेत. कार्यक्रमाचे संचालन वैशाली रेवाळे, श्वेता दीक्षित यांनी केले. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा