अकोल्यातील हिवरखेड येथे सराफांची तीन जणांची दुकाने फोडली

By राजेश शेगोकार | Updated: May 8, 2023 18:08 IST2023-05-08T18:05:42+5:302023-05-08T18:08:52+5:30

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी ओम ज्वेलर्स, साक्षी ज्वेलर्स, व साई ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून प्रवेश केला

At Hiwarkhed in Akola, the shops of three goldsmiths were broken into | अकोल्यातील हिवरखेड येथे सराफांची तीन जणांची दुकाने फोडली

अकोल्यातील हिवरखेड येथे सराफांची तीन जणांची दुकाने फोडली

अकाेला : तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील  मेन रोडवरील सोन्या चांदीचे दुकाने अज्ञात चाेरटयांनी फाेडून लाखो रुपयांचा आवाज लंपास केल्याची घटना साेमवारी समाेर आली आहे. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी ओम ज्वेलर्स, साक्षी ज्वेलर्स, व साई ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून प्रवेश केला दूकानातील साेन्याचे दागीणे,  चांदीच्या वस्तू , ब्रासलेट असा  एकूण दोन लाख नऊ हजार मुद्देमाल लंपास  केल्याची तक्रार आहे या प्रकरणात पाेलीसांनी श्वान पथकाच्या मदतीने माग काढण्याचा प्रयत्न केला असता श्वान त्याच परिसरात घुटमळत राहिल्याने चाेरटयांचा माग लागला नाही. पाेलीसांनी या अज्ञात चाेरटयाविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: At Hiwarkhed in Akola, the shops of three goldsmiths were broken into

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.