शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पाच तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचे सत्यमापन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 13:26 IST

अकोला: जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचे क्षेत्रीय सत्यमापनाचे काम महसूल आणि कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आले असून, त्यामध्ये घेण्यात येणारी माहिती शासनाच्या ‘महामदत अ‍ॅप’वर ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

- संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचे क्षेत्रीय सत्यमापनाचे काम महसूल आणि कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आले असून, त्यामध्ये घेण्यात येणारी माहिती शासनाच्या ‘महामदत अ‍ॅप’वर ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.पावसातील खंड, भूजल पातळी, आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन कमी होणार असल्याने, जिल्ह्यातील अकोट व पातूर हे दोन तालुके वगळता अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर इत्यादी पाच तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने संबंधित पाचही तालुक्यांतील दुष्काळसदृश परिस्थितीचे क्षेत्रीय सत्यमापनाचे काम महसूल व कृषी विभागामार्फत २० आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आले आहे. पाचही तालुक्यातील क्षेत्रीय सत्यमापनात घेण्यात आलेली गावनिहाय दुष्काळसदृश परिस्थितीची माहिती शासनाच्या ‘महामदत अ‍ॅप’वर ‘अपलोड’ करण्यात येत आहे.दुष्काळी परिस्थितीचे असे करण्यात येत आहे सत्यमापन!जिल्ह्यातील पाच तालुक्यातील गावागावांत महसूल आणि कृषी विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांमार्फत दुष्काळसदृश परिस्थितीचे सत्यमापनाचे काम करण्यात येत आहे. त्यामध्ये शेत सर्व्हे नंबर, शेतकरी, शेतकºयाचा आधार क्रमांक, पीक पेरणीचे एकूण क्षेत्र त्यापैकी प्रत्यक्ष पेरणीचे क्षेत्र, पिकांची परिस्थिती, पीक नुकसानाचे छायाचित्र, पीक नुकसानाचे प्रमाण आणि पिकांचे उत्पादन इत्यादी प्रकारची माहिती सत्यमापनात घेण्यात येत असून, ही माहिती शासनाच्या महामदत अ‍ॅपवर अपलोड करण्यात येत आहे.दुष्काळसदृश पाच तालुक्यांतअशी आहेत गावे!तालुका गावेअकोला १८२तेल्हारा १०६बाळापूर १०३मूर्तिजापूर १६४बार्शीटाकळी १५७..................................एकूण ७१२जिल्ह्यातील दुष्काळसदृश पाच तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीचे क्षेत्रीय सत्यमापनाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष पीक परिस्थिती, पिकांचे उत्पादन, पिकांचे नुकसान व इतर प्रकारची माहिती घेऊन, शासनाच्या ‘महामदत अ‍ॅप’वर ‘अपलोड’ करण्यात येत आहे.- राजेंद्र निकमजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

टॅग्स :Akolaअकोलाdroughtदुष्काळGovernmentसरकार