जुने शहरातील युवकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:19 IST2021-03-17T04:19:03+5:302021-03-17T04:19:03+5:30

अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिडकी पुरा येथील रहिवासी युवकावर दोन ते तीन जणांनी प्राणघातक ...

Assault on a young man in the old town | जुने शहरातील युवकावर प्राणघातक हल्ला

जुने शहरातील युवकावर प्राणघातक हल्ला

अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिडकी पुरा येथील रहिवासी युवकावर दोन ते तीन जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला आहे.

खिडकी पुरा येथील रहिवासी शेख मेहताब उर्फ सोनू शेख अल्ताफ या युवकावर परिसरातील काही जणांनी सोमवारी मध्यरात्री धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला चढविला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकास परिसरातील नागरिकांनी तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने या युवकास नातेवाइकांनी तातडीने खासगी रुग्णालयात हलविले. युवकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. संशयित मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी अज्ञात मारेकर्‍यांविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Assault on a young man in the old town