एटीएमचा पासवर्ड विचारून शेतकऱ्याला गंडविले
By Admin | Updated: April 21, 2017 01:50 IST2017-04-21T01:50:49+5:302017-04-21T01:50:49+5:30
तेल्हारा- मोबाइलवर ‘मी बँकेतून अधिकारी बोलतो, आपल्या एटीएम कार्डची मुदत संपली असून, नूतनीकरणासाठी आपले एटीएम कार्ड क्रमांक व पावसर्ड सांगा’, असे सांगण्यात आले.

एटीएमचा पासवर्ड विचारून शेतकऱ्याला गंडविले
तेल्हारा: तालुक्यातील बेलखेड येथील शेतकरी पंजाबराव नागोराव खुमकर यांना २० एप्रिलच्या सकाळी ६ वाजता मोबाइलवर ‘मी बँकेतून अधिकारी बोलतो, आपल्या एटीएम कार्डची मुदत संपली असून, नूतनीकरणासाठी आपले एटीएम कार्ड क्रमांक व पावसर्ड सांगा’, असे सांगण्यात आले. सदर शेतकऱ्याने विचारल्याप्रमाणे माहिती दिल्यानंतर त्यांच्या खात्यातून १० हजार रुपयांचा विड्रॉल झाल्याचा मेसेज त्यांना आला. आपण तर पैसे काढले नाही, मग मेसेज कसा, असा संशय आल्यामुळे बँकेत चौकशी करताच १० हजार रुपयाने गंडविल्याचे त्यांना कळले. त्यांनी त्याबाबत बँक अधिकाऱ्यांना सांगताच त्यांचे एटीएम कार्ड लॉक करण्यात आले.