अरुण दिवेकर स्मृती शरीरसौष्ठव स्पर्धा

By Admin | Updated: November 6, 2014 01:11 IST2014-11-06T00:45:50+5:302014-11-06T01:11:26+5:30

अकोला येथे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, जितेश गवई विजयी.

Arun Divekar Memorial Bodybuilding Competition | अरुण दिवेकर स्मृती शरीरसौष्ठव स्पर्धा

अरुण दिवेकर स्मृती शरीरसौष्ठव स्पर्धा

अकोला: जठारपेठ येथील आदर्श व्यायामशाळेत माजी क्रीडा राज्यमंत्री अरुण दिवेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा स्तर शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित केली होती. आदर्श श्री-२0१४ चा बहुमान जितेश गवई याने मिळविला.सूर्यनमस्कार गटामध्ये नवनाथ सुर्वे, बैठका गटात चेतन बुंदेले तर बेंच प्रेस गटात जितेश गवई याने प्रथमस्थान पटकाविले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष निखिलेश दिवेकर, उपाध्यक्ष श्याम संगर, सचिव सुभाष सातव, बंडू कापसे, काशी बेहेल, दिलीप देशपांडे, आनंद कळमकर, देवानंद टाले, दीपक ठाकूर, महादेव मेहेंगे उपस्थित होते. अकोला शहरातील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे याप्रसंगी निखिलेश दिवेकर यांनी सांगितले. स्पर्धेत पंच म्हणून राजेश देशमुख, मिलिंद सातव आदींनी काम पाहिले.

Web Title: Arun Divekar Memorial Bodybuilding Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.