खासदार शरद पवार यांचे अकोल्यात आगमन; सहकार मेळाव्याचे आयोजन
By Atul.jaiswal | Updated: October 12, 2023 11:53 IST2023-10-12T11:52:39+5:302023-10-12T11:53:34+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे सहकार मेळाव्यासाठी अकोल्यात आगमन झाले.

खासदार शरद पवार यांचे अकोल्यात आगमन; सहकार मेळाव्याचे आयोजन
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे सहकार मेळाव्यासाठी अकोल्यात आगमन झाले असून, सभेपूर्वी शहरातील अशोक वाटिका येथे जाऊन तथागत गौतम बुद्ध ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्प माला अर्पण करून वंदन केले. यावेळी त्यांच्यासाेबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
अकाेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी स्व. डाॅ. वा. रा. उपाख्य अण्णासाहेब काेरपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयाेजित सहकार महामेळाव्यासह विविध कार्यक्रमांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची गुरुवारी सकाळी विमानाद्वारे अकाेल्यात आगमण झाले. विमानतळावरून त्यांचा ताफा कौलखेड येथे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाला. कौलखेड चौकात शरद पवार यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
गुलाबराव गावंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्यानंतर शरद पवार यांचा ताफा सहकार महामेळाव्याच्या आयोजनस्थळाकडे रवाना झाला. वाटेत अशोक वाटीका येथे थांबून पवार व सोबतच्या मान्यवरांनी तथागत गौतम बुद्ध ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्प माला अर्पण करून वंदन केले. त्यानंतर पवार हे अकोला क्रिकेट क्लब मैदानावर होत असलेल्या सहकार महामेळाव्यात उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले.