एमआयडीसीतून तूरडाळ चाेरणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST2021-07-07T04:23:17+5:302021-07-07T04:23:17+5:30

एमआयडीसीमध्ये माेहित गजानन भाला यांची ओम ॲग्राे इंडस्ट्रीज नावाने दाल मिल असून, या मिलमधून अज्ञात चाेरट्याने ३० जून राेजी ...

Arrested for stealing pulses from MIDC | एमआयडीसीतून तूरडाळ चाेरणारा अटकेत

एमआयडीसीतून तूरडाळ चाेरणारा अटकेत

एमआयडीसीमध्ये माेहित गजानन भाला यांची ओम ॲग्राे इंडस्ट्रीज नावाने दाल मिल असून, या मिलमधून अज्ञात चाेरट्याने ३० जून राेजी ६५ हजार रुपये किमतीचे ३२ पाेते तूरडाळ चाेरी केले हाेते. याप्रकरणी भाला यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मिळालेल्या माहितीवरून पाेलिसांनी प्रीतम दलित खिल्लारे, रा. गाैतमनगर, शिवणी यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कसून चाैकशी केली असता आराेपीने चाेरी केल्याची कबुली दिली. यावरून पाेलिसांनी त्याच्याकडून चाेरीसाठी वापरलेली ऑटाे व तुरीचे पाेते असा एकूण दाेन लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे ठाणेदार किशाेर वानखेडे, दयाराम राठाेड, नीलेश भाेजने, संताेष डाबेराव यांनी केली.

Web Title: Arrested for stealing pulses from MIDC