गणेश विसर्जन मिरवणूक परिसरात दारू विक्री करणारे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:20 IST2021-09-21T04:20:54+5:302021-09-21T04:20:54+5:30
आकाेट फैल परिसरातील राजूनगर येथे देशी व विदेशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना ...

गणेश विसर्जन मिरवणूक परिसरात दारू विक्री करणारे अटकेत
आकाेट फैल परिसरातील राजूनगर येथे देशी व विदेशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळताच, त्यांनी छापा टाकून विजय वसंता रक्षक, आकाश राजू नागदेवे, संतोष किशन खंडारे, शंकर भगवान सावलळे या चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५० हजार रुपये किमतीच्या तब्बल ६०९ दारूच्या बाॅटल जप्त केल्या. या चार दारू विक्रेत्यांविरुद्ध अकोटफाइल पाेलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर त्यानंतर खडकी परिसरातील एका ढाब्यावर माेठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारूची विक्री सुुरू असल्याच्या माहितीवरून विलास पाटील यांनी छापा टाकून ७ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला़ दारू विक्री करणारा मंगेश ढाेरे यास ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध खदान पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.