हातकडीसह पळून गेलेल्या आरोपीस अटक

By Admin | Updated: January 30, 2016 02:24 IST2016-01-30T02:24:01+5:302016-01-30T02:24:01+5:30

आकोट येथील ग्रामीण रुग्णालयातून काढला होता पळ.

Arrested accused escaped with a handcuff | हातकडीसह पळून गेलेल्या आरोपीस अटक

हातकडीसह पळून गेलेल्या आरोपीस अटक

आकोट: येथील ग्रामीण रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देत हातकडीसह पळून गेलेल्या पसार आरोपी विलास नारायण तायडे याला मध्य प्रदेशातील एका गावामधून आकोट शहर पोलिसांनी २८ जानेवारी रोजी ताब्यात घेतले. हा आरोपी १६ नोव्हेंबर २0१५ रोजी हिवरखेड पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता. आरोपी हा मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर भागात असलेल्या तुकईथळ गावात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून आकोट शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्‍यांनी पाळत ठेवली. पथकाला पाहताच आरोपीने पलायनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली. ही कारवाई कासम नौरंगाबादी, पोलीस कॉन्स्टेबल वासुदेव ठोसरे, प्रमोद चव्हाण, संतोष गावंडे, रोहित तिवारी यांनी केली.

Web Title: Arrested accused escaped with a handcuff