इसमाची हत्या करणाऱ्या बहीण भावास अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST2021-09-25T04:19:03+5:302021-09-25T04:19:03+5:30
राष्ट्रीय नेते व संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे यांचे नेतृत्वाखाली ...

इसमाची हत्या करणाऱ्या बहीण भावास अटक करा
राष्ट्रीय नेते व संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे यांचे नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन मृतक सुनील लक्ष्मण गवई यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सुनील गवई हे चर्मकार समाजातील गरीब व्यक्ती असून त्यांचा चप्पलांचा व्यवसाय होता. कुटुंबातील कमवते व्यक्ती मयत झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रवीण वि. चोपडे , महानगर अध्यक्ष शिवलाल मो. इंगळे ,जिल्हा महासचिव सुनील .झेड.गवई, जिल्हा युवा अध्यक्ष सुमित पानझाडे,जिल्हा महिला अध्यक्षा प्रतीभा शिरभाते, महिला महानगर अध्यक्षा छाया इंगळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.