मेडिकल शॉपी फोडणार्‍या चोरट्यास अटक

By Admin | Updated: March 30, 2017 03:15 IST2017-03-30T03:15:29+5:302017-03-30T03:15:29+5:30

न्यायालयाने दिला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश.

The arrest of a medical shopper who was robbing thieves | मेडिकल शॉपी फोडणार्‍या चोरट्यास अटक

मेडिकल शॉपी फोडणार्‍या चोरट्यास अटक

अकोला, दि. २९-रामदास पेठेतील टिळक पार्कजवळील मेडिकल शॉपी फोडणार्‍या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यास न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. टिळक पार्कजवळ मनोज विलास रोकडे यांची मेडिकल शॉपी आहे. फेब्रुवारी महिन्यात अज्ञात चोरट्याने शॉपी फोडून गल्ल्यातील १४ हजार ५00 रुपये रोख लंपास केले. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये हमजा प्लॉटमध्ये राहणारा शेख कासम उर्फ गुड्ड शेख कबीर (२२) याचे संशयित म्हणून नाव समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे शेरअली, अमित दुबे, संदीप काटकर यांनी केली.

Web Title: The arrest of a medical shopper who was robbing thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.