कोविड मनोरुग्णांची वेगळी व्यवस्था करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST2021-03-27T04:19:02+5:302021-03-27T04:19:02+5:30
काेराेना नियंत्रणासाठी नियम पाळा अकोला महानगरपालिका क्षेत्रातील ज्या नागरिकांना सर्दी, ताप, खोकला व कोरोनासदृश लक्षणे असतील त्यांनी आपली ...

कोविड मनोरुग्णांची वेगळी व्यवस्था करा
काेराेना नियंत्रणासाठी नियम पाळा
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील ज्या नागरिकांना सर्दी, ताप, खोकला व कोरोनासदृश लक्षणे असतील त्यांनी आपली झोन अंतर्गत सुरू असलेल्या चाचणी केंद्रावर किंवा मोबाईल कोविड चाचणी बसमध्ये चाचणी करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.
विदर्भ राज्य आघाडीचा बंदमध्ये सहभाग
अकोला : शेतकऱ्यांनी दिल्ली येथे पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटनांनी मिळून भारत बंद पुकारला आहे. त्याला विदर्भ राज्य आघाडीने पाठिंबा देत बंदमध्ये सहभाग घेतल्याची माहिती विदर्भ राज्य आघाडीचे पश्चिम विदर्भ सिद्धार्थ इंगळे यांनी दिली
हनुमान चालिसाचे पाठ
अकोला श्रीरामनवमी शोभायात्रा समितीतर्फे यंदा २८ मार्च ते २७ एप्रिल हनुमान जयंतीपर्यंत हनुमान चालिसा पाठ करण्याचे आवाहन केले आहे. रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण सत्संग मंडळ व श्री जानकी वल्लभ धर्मार्थ संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचा अभिनय वा कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला आहे
मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करा
अकोला मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका राज्य सरकारने स्पष्ट करावी. वारंवार केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचा प्रकार करू नये. केंद्र सरकारने सुनावणीच्या वेळी आपली भूमिका स्पष्ट करून मराठा समाजाला न्याय दिल्याची प्रतिक्रिया अकाेला भाजपच्या वतीने देण्यात आली आहे.