शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील पुनर्वसित आदिवासी व सुरक्षा दलात सशस्त्र संघर्ष; २० जवान जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 17:24 IST

अकोट (अकोला) : पुनर्वसित गावांमध्ये शासनाकडून उपेक्षा झाल्यानंतर पुन्हा मेळघाटातील मुळ गावांमध्ये परतण्याच्या भूमिकेवर ठाम असलेले आदीवासी ग्रामस्थ व सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी दुपारी मेळघाटातील केलपानी, गुल्लरघाट परिसरात सशस्त्र संघर्ष झाला.

ठळक मुद्देराज्य पोलिस, राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) व वनविभागाचे जवळपास २० जवान जखमी झाले. या संघर्षात १० ते १५ आदिवासी बांधव जखमी झाल्याची माहिती आहे. आदीवासी ग्रामस्थांनी दगड, तिर कमठा, गोफण, काठ्या व मिरची पावडरने सुरक्षा दलाच्या जवांनावर हल्ला केला.

अकोट (अकोला) : पुनर्वसित गावांमध्ये शासनाकडून उपेक्षा झाल्यानंतर पुन्हा मेळघाटातील मुळ गावांमध्ये परतण्याच्या भूमिकेवर ठाम असलेले आदीवासी ग्रामस्थ व सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी दुपारी मेळघाटातील केलपानी, गुल्लरघाट परिसरात सशस्त्र संघर्ष झाला. यामध्ये राज्य पोलिस, राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) व वनविभागाचे जवळपास २० जवान जखमी झाले. या संघर्षात १० ते १५ आदिवासी बांधव जखमी झाल्याची माहिती आहे. सदर परिसर हा दुर्गम असल्याने नेमके चित्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.पुनर्वसित अमोणा, बारुखेडा, धारगड, सोमठाणा बु., सोमठाणा खु., गुल्लरघाट, केलपाणी, नागरतास या गावांतील ग्रामस्थांनी १५ जानेवारी रोजी आपल्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने मेळघाटमधील जुन्या गावात परतले. तेव्हापासून या परिसराला वन व पोलीस विभागाच्या छावणीचे स्वरूप आले आहे. गावकरी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने त्यांना समजावून बाहेर काढण्याकरिता प्रशासन व आदीवासी ग्रामस्थांमध्ये चर्चा झाली. परंतु, चर्चा फिस्कटल्यामुळे आदीवासी ग्रामस्थ गुल्लरघाट परिसरात कुटुंबासह ठाण मांडून आहेत. दरम्यान, मंगळवारी, दुपारी पोलिस, एसआरपीएफ व वनविभागाचे कर्मचारी आदिवासी ग्रामस्थांना त्यांच्या गावात परत पाठविण्यासाठी आले असता. त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर आदीवासी ग्रामस्थांनी दगड, तिर कमठा, गोफण, काठ्या व मिरची पावडरने सुरक्षा दलाच्या जवांनावर हल्ला केला. शेकडो ग्रामस्थांनी अचानक चढविलेल्या हल्ल्यामुळे गांगारुन गेलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांनीही त्यांच्यावर हल्ला केला. या सशस्त्र संघर्षात सुरक्षा दलाचे जवळपास २० जवान जखमी झाले. तर १० ते १५ आदिवासी जखमी झाले. जखमी जवानांना अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

परिस्थिती तणावपूर्णसशस्त्र संघर्षानंतर गुल्लरघाट परिसरात तणावपूर्ण परिस्थिती असून, अमरावती येथील पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळावर दाखल झाली आहे. पोलीस व वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटMelghatमेळघाटPoliceपोलिस