वाशिममध्ये युवकावर सशस्त्र हल्ला
By Admin | Updated: September 28, 2014 00:09 IST2014-09-28T00:03:43+5:302014-09-28T00:09:06+5:30
डोक्याला गंभीर दुखापत, युवक्याच्या हातातील अंगठय़ा, सोन्याची चेन लंपास.

वाशिममध्ये युवकावर सशस्त्र हल्ला
वाशिम : येथील रमेश टॉकिज परिसरात असलेल्या रिगल कॅफे समोर एका युवकावर २0 ते २५ युवकांनी सशस्त्र हल्ला केला. ही घटना २६ सप्टेंबर रोजी रात्री ९:३0 च्या सुमारास घडली.
येथील शिवाजी चौकामध्ये वास्तव्यास असलेले संतोष सत्यनारायण व्यास यांना २0 ते २५ युवकांनी रिगल कॅफे समोर असलेल्या एका गल्लीमध्ये अडवून विचारले की तुला आमच्या चिडीमारीबाबत रि पोर्ट कुणी दिला व कुणी सांगितले असे कारण समोर करून तलवार, लोखंडी पाईप व ईतर धारदार शस्त्रांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये व्यास यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याशिवाय सं तोष व्यास यांच्या हातामध्ये असलेल्या सोन्याच्या अंगठय़ा , गळ्यातील सोन्याची चेन लंपास केली. संतोष व्यास यांचेवर वाशिम येथील सामान्य रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी व्यास यांनी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. त्यांच्या या फिर्यादीवरून आरिफखाँ खुश्रीदखाँ, समशेरखाँ आरीफखाँ, शाररूखखाँ, इजाजखाँ ममताज, जुमेरखाँ शेरखाँ, एजाजखॉ पठाण, शकायत लियायत, जमीर हमीद, इल्लू, गब्बू नशीर यांच्यासह २0 ते २५ इसमांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार संग्राम सांगळे करीत आहेत.
परस्पर विरोधी असलेल्या या प्रकरणात नुरज हबी शेख गप्फार या महिलेने संतोष व्यास व पिंटू मदलाणी यांच्या विरूध्द तक्रार दिली. पिडीत महिलेने या दोघांवर घरात घुसून अलि शिवीगाळ केली व मारहाण केल्याचा आरोप केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरूध्द भादंविचे कलम ४५२, २९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.