क्षुल्लक कारणावरून एकावर सशस्त्र हल्ला

By Admin | Updated: June 19, 2015 02:50 IST2015-06-19T02:50:45+5:302015-06-19T02:50:45+5:30

महानमध्ये खळबळ; पोलीस अधीक्षकांनी दिली भेट.

Armed attack on one of the trivial reasons | क्षुल्लक कारणावरून एकावर सशस्त्र हल्ला

क्षुल्लक कारणावरून एकावर सशस्त्र हल्ला

महान (जि. अकोला): एकाच समाजातील दोन तरुणांमध्ये क्षुल्लक कारणावरून १८ जून रोजी सकाळी झालेल्या वादातून एका गटातील लोकांनी दुसर्‍या तरुणाच्या भावास दुपारी स्थानिक बसस्थानकाजवळील एका हॉटेलबाहेर उभा असल्याचे पाहून शस्त्रांसह तेथे जाऊन त्याच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.परंतु, वार चुकल्याने तो बचावला. या घटनेने महान गावात प्रचंड खळबळ उडाली.
महान येथील शे.अलीम शे.महेमूद हा गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मोटारसायकलने येथील बसस्थानकावर आला होता. त्यावेळी तेथे उभ्या असलेल्या शे.मोबीन शे.मुनाफ याने त्याला 'तुझी मोटारसायकल मला दे' असे म्हटले. परंतु, शे. अलीमने त्याची मोटारसायकल शे.मोबीनला देत नाही असे म्हटले. त्यामुळे मोबीनने चिडून जाऊन त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यामुळे तेथे लोक जमले. त्यांनी दोघांचीही समजूत काढून भांडण मिटविले. त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास शे.अलीमचा भाऊ शे.नाजीम शे.महेमुद हा संगम हॉटेलसमोर उभा असताना फिर्यादीच्या म्हणण्यानुसार शे.मोबीन हा पिंजरकडून तलवार घेऊन आला तर मोबीनचा साळा शे.रियाज शे.वहाब हा तीन लोकांसोबत एम.एच.२९ जे. ९६२ क्रमांकाच्या जीपने तेथे आला. त्यावेळी शे.मोबीनने शे.नाजीमकडे बोट दाखवून त्याच्या सोबत्यांना त्याच्यावर हल्ला करण्याचा आदेश दिला. त्यावरून त्यातील एकाने नाजीमवर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो सुदैवाने बचावला.
या घटनेची माहिती पिंजर पोलीस स्टेशनला देताच ठाणेदार शिरभाते, पोलीस उपनिरीक्षक फड व गायकी, तसेच अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. त्यांना उपस्थित लोकांनी गराडा घालून महान बसस्थानकावर घडलेल्या घटनेबाबत माहिती देऊन या प्रकारांना आळा घालण्याची मागणी केली.
सदर घटनेची माहिती मिळताच अकोल्याचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी भेट देऊन पिंजर पोलिसांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. हे वृत्त लिहिपर्र्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Armed attack on one of the trivial reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.