पुरातत्व विभागाने घेतला नाही धडा
By Admin | Updated: January 6, 2015 00:10 IST2015-01-06T00:10:25+5:302015-01-06T00:10:25+5:30
तोफ चोरीनंतर अद्याप पुरातत्व विभागाने सुरक्षेबाबत अजूनही फेरविचारच केला नाही.

पुरातत्व विभागाने घेतला नाही धडा
बुलडाणा : राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यातून १६ व्या शतकातील तोफ चोरी झाल्यानंतर पुरातत्व विभागाने अजूनही धडा घेतलेला नाही. राजवाड्यात असलेल्या ऐतिहासिक वस्तू ज्या मोठय़ा पेटीत ठेवलेल्या आहेत त्या पेटीला लावण्यात आलेली कुलपे अतिशय कमकवुत असल्याची बाब समोर आली आहे. राजवाड्यात असलेल्या ऐतिहासिक दस्तावेज, काही शिल्प व पुरातन हत्यारे एक प्लायवुडच्या खोक्यात अर्थात पेटीत ठेवण्यात आली आहेत. या पेटीला लावलेली कुलपे दोन्ही पेटीच्या मानाने खूपच लहान असून, ते एखाद्या आघाताने सहज तुटू शकतात. तोफ चोरी प्रकरणानंतर पोलिसांनीसुद्धा ही बाब पुरातत्व खात्याच्या निदर्शनास आणून दिली होती. आता पंधरवडा उलटला तरी पुरातत्व विभागने सुरक्षा व्यवस्थेबाबत फेरविचार करून सुरक्षा वाढविण्यासाठी कुठलीही भूमिका घेतल्याचे राजवाडा परिसरात फिरताना दिसून येत नाही.