बलात्कार प्रकरणातील आराेपीस पाेलीस काेठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:18 IST2021-08-01T04:18:42+5:302021-08-01T04:18:42+5:30
खामगाव येथील धाेबी खदान परिसरातील रहिवासी मंगेश ऊर्फ अनिकेत बबन बांगर (वय २२) याचे त्याच्याच घराजवळ त्यावेळी रहिवासी असलेल्या ...

बलात्कार प्रकरणातील आराेपीस पाेलीस काेठडी
खामगाव येथील धाेबी खदान परिसरातील रहिवासी मंगेश ऊर्फ अनिकेत बबन बांगर (वय २२) याचे त्याच्याच घराजवळ त्यावेळी रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीवर प्रेम झाले. या प्रेमात दाेघेही दाेन ते तीन वर्षांपेक्षा अधिक काळ साेबत राहिले. याचदरम्यान आराेपीने मुलीला लग्नाचे आमिष दाखवीत शारीरिक संबंध ठेवले. काही वेळा खामगाव येथे जबरी संभाेगही केला. यामध्ये मुलगी गर्भवती झाल्याने तिचा गर्भपातही केल्याची माहिती आहे. या प्रकरणात आता अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याने ती स्वत:हून जिल्ह्यातील एका रुग्णालयात दाखल झाली. त्यानंतर पाेलीस ठाण्यात देण्यात आलेल्या माहितीवरून पाेलिसांनी चाैकशी करून आराेपी मंगेश बांगर याच्याविरुद्ध जुने शहर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आराेपीला जुने शहर पाेलिसांनी तातडीने अटक केल्यानंतर न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने आराेपीस ३ ऑगस्टपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली़