उपाययोजना मंजूर; पण कामे केव्हा होणार?
By Admin | Updated: April 20, 2016 02:13 IST2016-04-20T02:13:50+5:302016-04-20T02:13:50+5:30
पाणीटंचाई निवारणाच्या बैठकीत लोकप्रतिनिधींचा सवाल.

उपाययोजना मंजूर; पण कामे केव्हा होणार?
अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात विविध उपाययोजना मंजूर करण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्ष पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा होणार, असा सवाल जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात पाणीटंचाई निवारणाच्या आढावा बैठकीत उपस्थित केला. तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थि ती निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, महापौर उज्ज्वला देशमुख, आ.हरीश पिंपळे, आ.बळीराम सिरस्कार, आ. रणधीर सावरकर, आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.प्रकाश भारसाकळे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, महानगरपालिका आयुक्त अजय लहाने, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार उपस्थित होते. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृ ती आराखडा प्रशासनामार्फत मंजूर करण्यात आला; मात्र उ पाययोजनांची कामे केव्हा होणार, पाणीटंचाईग्रस्त गावांमधील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा लाभ केव्हा मिळणार, संबंधित गावांमधील पाणीटंचाईचे निवारण केव्हा होणार, असा सवाल आ. हरीश पिंपळे, आ.रणधीर सावरकर, आ.प्रकाश भारसाकळे यांनी या बैठकीत उपस्थित केला. पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे तातडीने पूर्ण झाली पाहिजे, अशी सूचनाही लोकप्रतिनिधींनी या बैठकी त लावून धरली. या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.