दलित वस्ती कामांच्या नियोजनास मंजूरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST2021-03-27T04:19:26+5:302021-03-27T04:19:26+5:30

अकोला: अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास ( दलित वस्ती) योजनेंतर्गत मंजूर ५० कोटींच्या निधीतून जिल्ह्यातील कामांच्या नियोजनास ...

Approval for planning of Dalit Vasti works! | दलित वस्ती कामांच्या नियोजनास मंजूरी!

दलित वस्ती कामांच्या नियोजनास मंजूरी!

अकोला: अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास ( दलित वस्ती) योजनेंतर्गत मंजूर ५० कोटींच्या निधीतून जिल्ह्यातील कामांच्या नियोजनास जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी मंजूरी देण्यात आली.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजनेंतर्गत जिल्ह्यात करावयाच्या विविध विकासकामांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. मंजूर निधीतून जिल्ह्यातील सातही तालुक्यात करावयाच्या कामांचे नियोजन जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आले. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या मुद्दयावर या सभेत चर्चा करण्यात आली. तसेच समितीच्या मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समितीचे सदस्य व समाजकल्याण अधिकारी आर.एस.वसतकार उपस्थित होते.

Web Title: Approval for planning of Dalit Vasti works!