शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

चार गावांत पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मंजुरी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

By संतोष येलकर | Updated: June 23, 2024 14:41 IST

कूपनलिका, विंधन विहिरींची कामे

अकोला : पावसाळा सुरू होऊन वीस दिवसांचा कालावधी उलटून गेला असला तरी, जिल्ह्यात अद्याप सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांत पाणीटंचाईची समस्या कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर चार गावांतील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शुक्रवार, दि. २१ जून रोजी दिला. त्यामध्ये तीन कूपनलिका व एक विंधन विहिरीच्या उपाययोजनांचा समावेश आहे.

यंदाचा उन्हाळा संपला असून, गेल्या दि. १ जूनपासून पावसाळा सुरू झाला. वीस दिवस उलटून गेले; मात्र जिल्ह्यात सार्वत्रिक जोरदार पाऊस अद्याप बरसला नसल्याने, पावसाळ्यातही जिल्ह्यातील विविध भागांत पाणीटंचाईच्या समस्येचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. त्यानुषंगाने १ ते ३० या कालावधीसाठी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या पूरक कृती आराखड्यास पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजुरी देण्यात आली आहे. पूरक कृती आराखड्यात समाविष्ट उपाययोजनांपैकी तेल्हारा व अकोट या दोन तालुक्यांतील चार गावांतील पाणीटंचाई निवारणासाठी तीन कूपनलिका व एक विंधन विहीर अशा चार उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकारी कुंभार यांच्या आदेशानुसार प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

मंजूर केलेल्या अशा आहेतगावनिहाय उपाययोजना !तालुका गाव उपाययोजनातेल्हारा भोकर १ कूपनलिकातेल्हारा भिली १ विंधन विहीरअकोट पिंप्री खुर्द १ कूपनलिकाअकोट ताजनापूर १ कूपनलिका

३० जूनपर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश !प्रशासकीय मंजुरी दिलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे ३० जूनपर्यंत किंवा त्यापूर्वी पूर्ण करून, त्याद्वारे प्रत्यक्ष पाणीपुरवठा करण्यात यावा आणि संबंधित गावांतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, याकडे लक्ष देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

टॅग्स :Waterपाणी