आरोग्य उपकेंद्रांमध्ये ९६ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:14 IST2020-12-09T04:14:33+5:302020-12-09T04:14:33+5:30

अकोला: राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांमध्ये कंत्राटी तत्त्वावर ९६ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. ...

Appointment of 96 community health officers in health sub-centers! | आरोग्य उपकेंद्रांमध्ये ९६ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती!

आरोग्य उपकेंद्रांमध्ये ९६ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती!

अकोला: राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांमध्ये कंत्राटी तत्त्वावर ९६ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. समुपदेशनाव्दारे समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार यांनी दिला.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांमध्ये कंत्राटी तत्त्वावर समुदाय आरोग्य अधिकारी पदांसाठी जिल्हा परिषदमार्फत गत ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये निवड झालेल्या ९६ उमेदवारांची जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांमध्ये कंत्राटी तत्त्वावर समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. समुपदेशन प्रक्रियेव्दारे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार यांनी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना नियुक्तीचे आदेश दिले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुरेश आसोले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Appointment of 96 community health officers in health sub-centers!